मुंबई-पुणे-अहमदाबाद, टी-२० वर्ल्डकपसाठी BCCI करतंय ३ ठिकाणांचा विचार
आयपीएलचा उर्वरित सिझन युएईला शिफ्ट करत बीसीसीआयने आपलं होणारं आर्थिक नुकसान टाळलं आहे. परंतू याव्यतिरीक्त टी-२० वर्ल्डकपचं आयोजन हा सध्याच्या घडीला बीसीसीआयसमोरचा आणखी एक महत्वाचा मुद्दा असणार आहे. टी-२० वर्ल्डकप आयोजनाबद्दल BCCI ने सावध भूमिका घेतली असून भारतातच ही स्पर्धा आयोजित करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. सूत्रांनी दिलेल्या बातमीनुसार, बीसीसीआय टी-२० वर्ल्डकपसाठी मुंबई-पुणे-अहमदाबाद या झोनचा विचार […]
ADVERTISEMENT
आयपीएलचा उर्वरित सिझन युएईला शिफ्ट करत बीसीसीआयने आपलं होणारं आर्थिक नुकसान टाळलं आहे. परंतू याव्यतिरीक्त टी-२० वर्ल्डकपचं आयोजन हा सध्याच्या घडीला बीसीसीआयसमोरचा आणखी एक महत्वाचा मुद्दा असणार आहे. टी-२० वर्ल्डकप आयोजनाबद्दल BCCI ने सावध भूमिका घेतली असून भारतातच ही स्पर्धा आयोजित करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे.
ADVERTISEMENT
सूत्रांनी दिलेल्या बातमीनुसार, बीसीसीआय टी-२० वर्ल्डकपसाठी मुंबई-पुणे-अहमदाबाद या झोनचा विचार करत आहे. १ जूनला आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या आयोजनासाठी बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता आहे. परंतू या बैठकीत बीसीसीआय आयसीसीकडे आयोजनासंदर्भात वेळ मागणार आहे. २९ मे ला झालेल्या बैठकीत सर्व सभासदांनी याला होकार दर्शवला आहे.
मुंबई-पुणे आणि अहमदाबाद या शहरांमध्ये सामन्यांचं आयोजन झाल्यास प्रवासाचा वेळ वाचू शकतो. मुंबईतली ३ मैदानं, पुण्यातलं एक मैदान आणि अहमदाबादमधलं नरेंद्र मोदी मैदान अशा पाच मैदानांवर टी-२० वर्ल्डकपचं आयोजन करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. परंतू बीसीसीआयने हा प्लान आखला असला तरीही आयसीसी यासाठी होकार देईल याची खात्री नाहीये. बायो सिक्युअर बबल मोडून खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयला आयपीएल २०२१ मध्यावधीत स्थगित करायला लागलं होतं.
हे वाचलं का?
यानंतर आयसीसीने टी-२० वर्ल्डकप भारतात आयोजित करायचा की नाही यावर विचार करायचं ठरवलं आहे. युएई हा आयसीसीने आयोजनासाठी अधिकृत पर्याय जाहीर केला आहे. “सध्याच्या घडीला आयोजनाची परवानी मिळण्यासाठी अनेक गोष्टींवर अवलंबून रहावं लागणार आहे. पण किमान आम्ही आमचा प्लान तयार ठेवला आहे. त्याला मान्यता द्यायची की नाही हे आयसीसीच्या हातात असेल”, BCCI मधील सूत्राने माहिती दिली. त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीत आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनाबद्दल काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT