IPL 2021 स्थगित, BCCI ला दोन हजार कोटींचं नुकसान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लागोपाठ ३ संघातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल २०२१ मधले उर्वरित सर्व सामने स्थगित केले आहेत. देश कोरोनाशी लढत असताना आयपीएलच्या सामन्यांना परवानगी कशी मिळते असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात होता. अखेरीस खेळाडूंचं आरोग्य लक्षात घेत बीसीसीआयने ही स्पर्धा स्थगित केली आहे. परंतू मध्यावधीत स्पर्धा स्थगित केल्यामुळे बीसीसीआयचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयला यंदा दोन हजार कोटींच्या घरात नुकसान होणार आहे.

ADVERTISEMENT

IPL 2021 कोरोनामुळे स्थगित, BCCI समोर स्पर्धा पुन्हा खेळवण्यासाठी हे ३ पर्याय उपलब्ध

ब्रॉडकास्ट आणि स्पॉन्सरशीपच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांवर बीसीसीआयला यंदा पाणी सोडावं लागणार असं दिसत आहे. “स्पर्धा मध्यावधीत स्थगित करावी लागल्यामुळे आम्हाला अंदाजे दोन ते अडीच हजार कोटींचं नुकसान होणार आहे.” बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला ही माहिती दिली. बीसीसीआयला सध्याच्या परिस्थितीत Star Sports या चॅनलकडून मिळणाऱ्या ब्रॉडकास्टिंग राईट्सच्या पैशांचा मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. प्रत्येक हंगामात बीसीसीआयला Star कडून सर्वाधिक पैसे मिळतात. Star India आणि BCCI यांच्यात आयपीएलच्या सामन्यांचं ब्रॉडकास्टिंग करण्यासाठी ५ वर्षांचा करार झाला होता.

हे वाचलं का?

पाच वर्षांसाठी Star India BCCI ला १६ हजार ३४७ कोटी रुपये देत होतं, याचाच अर्थ प्रत्येक हंगामात बीसीसीआयला Star कडून ३२६९ कोटी रुपये मिळणार होते. जर एका हंगामात ६० सामने होणार असतील तर प्रत्येक सामन्याची किंमत ही अंदाजे ५४ कोटींच्या घरात जाते. यंदाच्या हंगामात २९ सामन्यांचं गणित लक्षात घेता Star ने बीसीसीआयला अंदाजे १५८० कोटी रुपये दिले असणार आहेत. त्यामुळे उर्वरित सामन्यांचं गणित लक्षात घेता बीसीसीआयला यंदा १६९० कोटींचा तोटा सहन करावा लागणार आहे. याचसोबत IPL च्या Title Sponsorship चे हक्क मिळवलेल्या Vivo या चिनी मोबाईल कंपनीनेही करारानुसार बीसीसीआयला ४४० कोटी रुपये देणं अपेक्षित आहे. परंतू यंदाचा हंगाम मध्यावधीत स्थगित करण्यात आल्यामुळे बीसीसीआय या रक्कमेतलाही काहीच हिस्सा मिळणार आहे.

IPL 2021 : Bio Secure Bubble म्हणजे नक्की काय?

ADVERTISEMENT

याव्यतिरीक्त Unacademy, Dream 11, Cred, Upstox, Tata Motars यासारखे ब्रँड्सही बीसीसीआयला १२० कोटींच्या घरात स्पॉन्सरशीप देत होते. परंतू यंदा या रक्कमेतलही काहीच रक्कम बीसीसीआयला मिळणार आहे. “स्पॉन्सरशीप आणि ब्रॉडकास्टिंग यातून मिळणाऱ्या पैशाचं गणित केलं तर अंदाजे हा तोटा २२०० कोटींच्या घरात जातो. हा माझा अंदाज आहे, खरा तोटा हा याच्यापेक्षा जास्तही असू शकतो”, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे हे नुकसान भरुन काढण्यासाठी बीसीसीआय काय उपाययोजना आखतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT