IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सला झुकतं माप? रोहितचं इतर संघांना आपल्या खास शैलीत दिलं उत्तर
आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात झाली आहे. सलामीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने गतविजेत्या चेन्नईला ६ विकेट्सने हरवलं. यंदाचं आयपीएल हो कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेत मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्येच आयोजित केलं आहे. मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉन, नवी मुंबईतील डी.वाय.पाटील तर पुण्यातील गहुंजे या स्टेडीअमवर यंदाचे सामने खेळवले जातील. बीसीसीआयच्या या निर्णयाला सुरुवातीला […]
ADVERTISEMENT
आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात झाली आहे. सलामीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने गतविजेत्या चेन्नईला ६ विकेट्सने हरवलं. यंदाचं आयपीएल हो कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेत मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्येच आयोजित केलं आहे. मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉन, नवी मुंबईतील डी.वाय.पाटील तर पुण्यातील गहुंजे या स्टेडीअमवर यंदाचे सामने खेळवले जातील.
ADVERTISEMENT
बीसीसीआयच्या या निर्णयाला सुरुवातीला काही संघमालकांनी विरोध दर्शवला होता. मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळेल अशी काही संघमालकांनी ओरड केली होती.
IPL 2022 : मुंबईकर हिटमॅनची अव्वल स्थानाकडे वाटचाल, जाणून घ्या रोहितने केलेल्या विक्रमाविषयी
हे वाचलं का?
या सर्व टीकेला रोहित शर्माने आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. “अनेक फ्रँचायझींनी म्हटले आहे की आम्हाला मुंबईत खेळू देऊ नये. त्यामुळे त्यावर माझे मत असे आहे की ज्या फ्रँचायझींना आक्षेप आहे त्यांनी त्यांच्या शहरात प्रत्येकी ३-४ मैदाने बांधावीत”. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या पेजवर एका कार्यक्रमात बोलत होता.
Just savage as always ?@ImRo45 | #MIvDCpic.twitter.com/kAaYGE1Lxv
— ishant (@Ishant45_) March 27, 2022
यावेळी बोलत असताना रोहित शर्माने घरच्या मैदानावर खेळण्याचा मुंबईच्या संघाला फायदा होईल ही शक्यताही फेटाळून लावली. मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजे वानखेडे स्टेडियमवर चार सामने खेळायला मिळणार आहेत. तर इतर कोणत्याही फ्रँचायझींना इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या लीमध्ये त्यांच्या घरच्या मैदानावर एकही सामना खेळायला मिळणार नाही.
ADVERTISEMENT
IPL 2022 : छोटा पॅकेट बडा धमका, महागडा खेळाडू इशान किशनने केली दिल्लीच्या बॉलर्सची धुलाई
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT