IPL 2022: बोली लावली मुंबईने खेळाडू विकला दिल्लीला, लिलावात चारु शर्मांचा घोळ पाहिलात का?
आयपीएलच्या आगामी हंगामासाठी लिलाव नुकताच बंगळुरुत पार पडला. दहाही संघांनी या लिलावात भारतीय खेळाडूंसाठी पैसा खर्च केला. मुंबई इंडियन्सने इशान किशनसाठी १५.२५ कोटी रुपये खर्च केले. यानंतर चेन्नई सुपरकिंग्जने दीपक चहरसाठी १४ कोटी रुपये मोजले. अनेक महत्वाच्या खेळाडूंवर या लिलावात बोली लागल्या नाहीत. पहिल्या दिवशी लिलाव सुरु असताना ब्रिटीश ऑक्शनर ह्यु एडमीस यांची तब्येत खालावल्यामुळे […]
ADVERTISEMENT
आयपीएलच्या आगामी हंगामासाठी लिलाव नुकताच बंगळुरुत पार पडला. दहाही संघांनी या लिलावात भारतीय खेळाडूंसाठी पैसा खर्च केला. मुंबई इंडियन्सने इशान किशनसाठी १५.२५ कोटी रुपये खर्च केले. यानंतर चेन्नई सुपरकिंग्जने दीपक चहरसाठी १४ कोटी रुपये मोजले. अनेक महत्वाच्या खेळाडूंवर या लिलावात बोली लागल्या नाहीत.
ADVERTISEMENT
पहिल्या दिवशी लिलाव सुरु असताना ब्रिटीश ऑक्शनर ह्यु एडमीस यांची तब्येत खालावल्यामुळे ते खाली कोसळले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना बीसीसीआयने प्रसिद्ध क्रिकेट समालोचक चारु शर्मा यांना पाचारण करुन त्यांच्याकडे लिलाव पार पाडण्याची जबाबदारी दिली. चारु शर्मांनीही आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न केला.
IPL 2022: फॉर्मात नसलेल्या अजिंक्यवर KKR ने दाखवला विश्वास, संघाचं नेतृत्व मिळण्याचे संकेत?
हे वाचलं का?
परंतू खलिल अहमदच्या बोलीदरम्यान निर्माण झालेल्या गोंधळामुळे चारु शर्मांनी मुंबईच्या संघाने सर्वात जास्त बोली लावलेली असतानाही दिल्लीच्या संघाला खलिल अहमद विकल्याचं जाहीर केलं.
IPL 2022 : यंदाच्या स्पर्धेत सहभागी होणार नाही तरीही मुंबईने ‘या’ खेळाडूसाठी मोजले ८ कोटी
ADVERTISEMENT
काय घडलं त्यावेळी नेमकी?
ADVERTISEMENT
लिलावाच्या दुसऱ्या दिवशी खलिल अहमदचं नाव आल्यानंतर मुंबई इंडियन्सने सर्वात आधी बोली लावली. खलिल अहमदची बेस प्राईज ५० लाख एवढी होती. मुंबईने खलिलसाठी बोली लावल्यानंतर दिल्लीनेही बोली लावण्यास सुरुवात केली. दोन्ही संघांच्या चढाओढीमध्ये खलिलवर लावण्यात आलेल्या बोलीचा आकडा ४ कोटी ६० लाखांच्या घरात पोहोचला. यानंतर मुंबईने खलिलसाठी ४ कोटी ८० लाख द्यायची तयारी दाखवल्यानंतर दिल्लीने लगेच ५ कोटींची बोली लावली.
IPL 2022: CSK-KKR आणि दिल्लीची मदार महाराष्ट्रातील खेळाडूंवर, मुंबईची स्थानिक खेळाडूंकडे पाठ
परंतू मुंबई इंडियन्सचा संघ काहीही केल्या खलिलला आपल्या संघात दाखल करुन घेण्यासाठी उत्सुक होता. ज्यामुळे त्यांनी ५ कोटी २५ लाखांची बोली लावली. यानंतर दिल्लीच्या टेबलवर चर्चांना सुरुवात झाली आणि सहमालक किरण कुमार यांनी आपलं पॅडल वर उचललं परंतू काही सेकंदांमध्ये त्यांनी पॅडल खाली करत चर्चेसाठी वेळ मागितला.
ऑक्शनर चारु शर्मांचा इथेच गोंधळ झाला आणि त्यांनी दिल्लीने खलिल अहमदवर ५ कोटी २५ लाखांची बोली लावल्याचं जाहीर केलं. ज्यानंतर मुंबईने या शर्यतीतून माघार घेतली आणि चारु शर्मांनी खलिल अहमद ५ कोटी २५ लाखांच्या बोलीवर दिल्ली कॅपिटल्स संघाकडे गेल्याचं जाहीर केलं. पाहा या घटनेचा व्हिडीओ…
— Addicric (@addicric) February 14, 2022
— Addicric (@addicric) February 14, 2022
मुंबई इंडियन्सने पहिल्या दिवशी सावध पवित्रा आजमावत फक्त दोन खेळाडूंवर बोली लावली. इशान किशनसाठी १५ कोटी २५ लाख तर दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविससाठी ३ कोटी मुंबईने पहिल्या दिवशी मोजले. यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याकडे जास्त रक्कम शिल्लक असताना मुंबईने जोफ्रा आर्चर, टायमल मिल्स, टीम डेव्हीड यांना मोठी रक्कम देत आपल्या संघात खरेदी केलं.
IPL 2022 Auction: ‘या’ खेळाडूंवर लक्ष्मी झाली प्रसन्न; 10 कोटींपेक्षाही जास्त लागली बोली
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT