IPL 2021 : जेसन बेहरनडॉर्फला CSK च्या संघात स्थान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आजपासून आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला भारतात सुरुवात होणार आहे. मुंबई विरुद्ध बंगळुरु यांच्यात चेन्नईत सलामीचा सामना रंगेल. या सामन्याआधीच चेन्नई सुपरकिंग्जच्या संघात एक महत्वाचा बदल झालेला पहायला मिळतोय. स्पर्धेतून माघार घेतलेल्या जोश हेजलवूडच्या जागेवर चेन्नई सुपरकिंग्जने जेसन बेहरनडॉर्फला संघात स्थान दिलं आहे.

ADVERTISEMENT

गेल्या १० महिन्यांपासून आपण विविध संघांकडून बायो सिक्युअर बबलमध्ये खेळत आहोत. पण आता मला आरामाची गरज असून थोडावेळ परिवारासोबत घालवायचा आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या आगामी होम सिझनसाठी आणि वर्ल्डकपसाठी मला तयार रहायचं आहे, या कारणामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये मी खेळणार नसल्याचं हेजलवूडने स्पष्ट केलं होतं.

IPL 2021 Explainer : तेराव्या सिझनमध्ये अपयशी तरीही मॅक्सवेलवर RCB ची कोट्यवधींची बोली, जाणून घ्या कारण…

हे वाचलं का?

यानंतर हेजलवूडच्या जागेवर संघात कोणाला संधी द्यायची यावरुन CSK मध्ये बरीच खलबत झाली. काही बॉलर्सनी CSK कडून खेळण्यास नकारही दिला. अखेरीस बेहरनडॉर्फला संघात समाविष्ट करुन घेण्यात चेन्नईला यश आलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून ११ वन-डे आणि ७ टी-२० सामने खेळण्याचा बेहरनडॉर्फला अनुभव आहे. याआधी २०१९ मध्ये जेसनने मुंबई इंडिय़न्सचं प्रतिनिधीत्व केलं होतं. यंदाच्या हंगामात चेन्नईचा सलामीचा सामना हा १० तारखेला दिल्ली कॅपिटल्ससोबत रंगणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT