Rishabh Pant: इंग्लंडमध्ये टीम इंडियावर Corona चं संकट, ऋषभ पंतनंतर आणखी एक जण पॉझिटिव्ह
इंग्लंड दौर्यावर गेलेल्या टीम इंडियावर (Team India) कोरोनाचं (Corona)संकट घोंघावत आहे. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंतनंतर (Rishabh Pant) टीम इंडियाच्या आणखी एका सहाय्यक कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्ट (Covid Report) पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे टीम इंडियाची चिंता अधिक वाढली आहे. टीम इंडियामध्ये आतापर्यंत एकूण तीन लोकांना कोरोनाची लागण (Covid Infected) झाली आहे. पण त्यापैकी एक जण […]
ADVERTISEMENT
इंग्लंड दौर्यावर गेलेल्या टीम इंडियावर (Team India) कोरोनाचं (Corona)संकट घोंघावत आहे. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंतनंतर (Rishabh Pant) टीम इंडियाच्या आणखी एका सहाय्यक कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्ट (Covid Report) पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे टीम इंडियाची चिंता अधिक वाढली आहे. टीम इंडियामध्ये आतापर्यंत एकूण तीन लोकांना कोरोनाची लागण (Covid Infected) झाली आहे. पण त्यापैकी एक जण बरा झाला आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार टीम इंडियातील सपोर्ट स्टाफ ज्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तो दयानंद गाराणी (Dayanand Garani) आहे जो थ्रोडाउन एक्सपर्ट (Throwdown Expert)आहे. याच्याच संपर्कात आल्याने वृद्धिमान साहा (Wridhiman Saha) आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण (Bharat Arun) यांनी देखील स्वत: ला आयसोलेट केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार टीम इंडियाचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह होते. यातील एक जण बरा झाला आहे. तर ऋषभ पंत हा अद्यापही आयसोलेशनमध्ये आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही खेळाडूंना सुरुवातीला सर्दी, खोकला यासारखी सौम्य लक्षणे दिसू लागली. पण दोघांची प्रकृती नियंत्रणात आहे. दरम्यान, ऋषभ पंतची कोरोना टेस्ट 18 जुलै रोजी होणार आहे. 18 जुलै रोजी ऋषभ पंत याचा दहावा दिवस असणार आहे. दरम्यान, इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी ऋषभ पंतने कोरोना प्रतिबंधक लस देखील घेतली होती.
हे वाचलं का?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC)च्या अंतिम सामन्यानंतर भारतीय खेळाडूंना (Indian Players) 20 दिवसांची रजा देण्यात आली होती. यावेळी बरेच खेळाडू ब्रिटनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेले होते. बायो-बबलमधून ब्रेक मिळाल्यानंतर सर्व खेळाडू लंडनमध्ये थांबले होते. आता कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू वगळता उर्वरित सर्व खेळाडू डरहमसाठी रवाना झाले आहेत. जिथे 20 जुलैपासून भारतीय संघाला काउंटी चॅम्पियनशिप इलेव्हन विरूद्ध सराव सामना खेळायचा आहे. बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सर्व खेळाडूंची पुन्हा कोरोना टेस्ट होणार आहे.
? NEWS: #TeamIndia off to Durham; Two members test positive
Wicket-keeper batsman Rishabh Pant, who tested positive for COVID-19 on 8th July, nears completion of his self-quarantine period while training assistant/net bowler Dayanand Garani has tested positive.
Details ?
— BCCI (@BCCI) July 15, 2021
टीम इंडियामध्ये कोरोना संक्रमणाचा प्रसार झाल्यानंतर आता अशी भीती व्यक्त केली जात आहे की, भारताला आपला संघ बदलावा लागू शकतो किंवा कसोटी मालिकेचे वेळापत्रक बदलण्याची गरज पडू शकते. पण असं असलं तरी इंग्लंड विरुद्धची मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. म्हणजे या सीरिजसाठी जवळजवळ 20 दिवस बाकी आहेत. त्यामुळे टीम इंडियाकडे सध्या तरी पुरेशा वेळ आहे.
ADVERTISEMENT
बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शहा (Jai Shah) यांनीही भारतीय संघाला ब्रिटनमधील वाढत्या कोव्हिड केसेसविषयी इशारा दिला होता. शाह यांनी खेळाडूंना गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्याचा सल्ला दिला होता. असे असूनही, बरेच खेळाडू फिरायला गेले असल्याचे समोर आलं होतं.
ADVERTISEMENT
जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) आपल्या पत्नीसमवेत लंडनच्या वेम्बले स्टेडियमवर युरो कप फुटबॉल सामना पाहण्यासाठी आला होता. तर ऋषभ पंतही तिथे गेला होता. तर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनीही बिम्बल्डनचा आनंद लुटला होता.
दरम्यान, भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध 4 ऑगस्टपासून 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT