Tokyo Paralympics : भारतीय खेळाडूंच्या भाल्याने घेतला पदकाचा वेध, देवेंद्र झाजरियाला रौप्यपदक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकाची लयलूट सुरुच ठेवली आहे. रविवारी भारताने एकाच दिवसात ३ पदकं मिळवल्यानंतर सोमवारीही धडाकेबाज कामगिरी सुरु ठेवली. भालाफेकीत भारताच्या देवेंद्र झाजरिया आणि सुंदरसिंग गुर्जर यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केली आहे.

ADVERTISEMENT

देवेंद्र झाजरियाचं पॅरालिम्पिक स्पर्धेतलं हे तिसरं मेडल ठरलं आहे. याआधी २००४ मध्ये अथेन्स आणि २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत देवेंद्रने गोल्ड मेडल मिळवलं होतं. झाजरियाने ६४.३५ मी. लांब भाला फेकत आपला रिओ पॅरालिम्पिकचा रेकॉर्डही मोडला. रिओमध्ये देवेंद्रने ६३.९७ मी. लांब भाला फेकला होता. परंतू सुवर्णपदकाच्या शर्यतीत देवेंद्र काही मी. अंतराने मागे राहिला. श्रीलंकेच्या दिनेश प्रियांथाने ६७.७० मी. लांब भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

दुसरीकडे भारताच्या सुंदरसिंग गुर्जरनेही ६४.०१ मी. लांब भाला फेकत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं. सुंदरसिंगने देवेंद्रचा रिओ पॅरालिम्पिकमधला रेकॉर्डही मोडला. २०१७ साली वर्ल्ड चॅम्पिअनशीपमध्ये गोल्ड मेडल जिंकून पॅरालिम्पिक स्पर्धेत पदार्पण केलं आहे.

हे वाचलं का?

Tokyo Paralympics: भारताच्या अवनी लेखराचा सुवर्णवेध, 10 मी. शूटिंग स्पर्धेत Gold Medal

सोमवारी सकाळच्या सत्रात भारताने नेमबाजीत सुवर्णपदकाची कमाई केली. अवनी लेखराने १०. मी नेमबाजीत सुवर्णपदक मिळवलं. यानंतर थाळीफेक प्रकारात भारताच्या योगेश काथुनियाने रौप्यपदकाची कमाई केली. देवेंद्र आणि सुंदर सिंगच्या पदकामुळे भारताची टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत ६ पदकांपर्यंत मजल मारलेली असून आतापर्यंत भारताची ही सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे.

ADVERTISEMENT

Tokyo Paralympics : भारताकडून पदकांची Hat Trick, थाळीफेक प्रकारात विनोद कुमारला कांस्यपदक

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT