IPL मधील नेट बॉलर्सना बॉलिंगसाठी किती पैसे मिळतात माहितीये का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

How much net bowlers earn in ipl
How much net bowlers earn in ipl
social share
google news

IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा हंगाम 31 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना गतविजेता गुजरात टायटन्स (GT) आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात होणार आहे. गुजरात संघाचा हा केवळ दुसरा हंगाम असून त्याचे कर्णधारपद स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे आहे. (Do you know how much net bowlers earn in IPL?)

ADVERTISEMENT

मेहनतीचं फळ ! SRH चा युवा बॉलर उमरान मलिकला टी-२० वर्ल्डकपसाठी नेट बॉलर म्हणून संधी

आयपीएलसाठी सर्व संघांची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. यासोबतच प्रशिक्षण शिबिरही आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात फलंदाजांना सराव करण्यासाठी नेट गोलंदाजांना पाचारण केले जाते. भारतासह इतर आंतरराष्ट्रीय संघही त्यांच्या तयारीसाठी नेट गोलंदाजांना बोलावतात.

बहुतेक नेट बॉलर्स विनामूल्य काम करतात

आयपीएलमध्ये खेळाडूंना किती फी मिळते, हे लिलाव आणि कराराद्वारे ठरवले जाते. पण नेट बॉलर्सना किती फी मिळते हे आजवर क्वचितच कुणाला माहीत असेल. नेट बॉलर्स आपली सेवा विनामूल्य देतात हे एकीं तर कदाचित तुम्हाला धक्का बसेल. तुम्ही म्हणाल की खेळाडू आणि कर्मचाऱ्यांवर करोडो रुपये खर्च करणाऱ्या फ्रँचायझी नेट बॉलर्सना फुकट का ठेवतात?

हे वाचलं का?

कोरोनाच्या काळात लाखो रुपये मिळायचे

होय हे बरोबर आहे. कोरोनापूर्वी नेट बॉलर्सना मोफत ठेवले जात होते. मग ती टीम इंडियाची असो किंवा आयपीएल संघांची. पण कोरोनादरम्यानच्या प्रोटोकॉलमुळे संपूर्ण हंगामात नेट बॉलर्सना बायो-बबलमध्ये ठेवावे लागले. त्यांना सोबत घेऊन जावे लागले. यामुळेच कोरोनाच्या वेळी नेट बॉलर्सनाही एका हंगामासाठी सुमारे 5 लाख रुपये दिले जात होते. राहण्या-खाण्याचा खर्चही उचलला जायचा.

यंदा IPLमध्ये चेन्नईला हलक्यात घेणं महागात पडेल; यामुळे आहे संघ मजबूत

पण कोरोनानंतर पुन्हा एकदा नेट बॉलर्सना मोफत ठेवण्याची परंपरा सुरू झाली. संघ कोणत्याही शहरात सामना खेळायला गेला तरी स्थानिक नेट गोलंदाजांची वाट पाहिली जाते. अशा परिस्थितीत नेट बॉलर्सना एकत्र ठेवून त्यांच्या खाण्यापिण्याचा आणि हॉटेलचा खर्च उचलण्याची गरज नाही.

ADVERTISEMENT

नेट बॉलरचा फायदा काय?

पण एका देशांतर्गत क्रिकेटपटूशी बोलल्यानंतर हे कळले की नेट बॉलर्सनाही ठेवण्यासाठी काही नियम आहेत. जर फ्रँचायझीला विशिष्ट नेट बॉलरची गरज असेल आणि त्याला फ्रँचायझी किंवा टीम मॅनेजमेंटने स्पेशल म्हटले तर त्या नेट बॉलरला दररोज सुमारे 7,000 रुपये दिले जातात.

ADVERTISEMENT

या परिस्थितीत, नेट बॉलरसाठी सर्वात मोठा फायदा म्हणजे फ्रँचायझी आहारापासून ग्रूमिंगपर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेते. त्या तरुण नेट बॉलरला फ्रँचायझीमध्ये सामील झाल्यानंतर खूप काही शिकायला मिळते. त्याला स्टार खेळाडूसमोर गोलंदाजी करण्याची संधी मिळते आणि गोलंदाजी प्रशिक्षकाकडून त्याला खूप काही शिकायला मिळते. तुमच्या उणिवांवर काम करण्याची संधी मिळेल.

IPL five new rules : आता आणखी मजा येणार, पाच नवे नियम आयपीएलचा गेम बदलणार

उमरानने नेट बॉलर म्हणून आपले स्थान निर्माण केले

एखाद्या क्रीडा अकादमीने आपल्या वतीने नेट गोलंदाजांची व्यवस्था केली किंवा एखादा खेळाडू स्वत: नेट गोलंदाज बनला तर त्याला मोबदला दिला जात नाही. हे केले जाते जेणेकरून खेळाडू नेट बॉलर बनून आपली प्रतिभा दाखवू शकेल. त्यामुळे त्याला आणखी संधी मिळण्याची शक्यता आहे. याचे उदाहरण म्हणजे उमरान मलिक. उमरानने नेट बॉलर म्हणून सनरायझर्स हैदराबाद संघात स्थान मिळवले आणि त्यानंतर टीम इंडियासाठीही खेळतोय.

IPL ची पहिली मॅच केव्हा झालेली? सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू कोण?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT