निवड होणार नाही, निवृत्तीचा विचार कर ! राहुल द्रविडच्या सल्ल्यावर भारतीय खेळाडूची नाराजी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आगामी श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची शनिवारी घोषणा करण्यात आली. ज्यात कसोटी मालिकेसाठी निवड समितीने अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा, वृद्धीमान साहा या अनुभवी खेळाडूंचा पत्ता कट केला. या संघनिवडीनंतर भारतीय संघाचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहाने संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीबद्दल आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. राहुल द्रविडने मला तुझी संघात निवड होणार नाही त्यामुळे निवृत्तीचा विचार कर असं सांगितल्याचं वृद्धीमान साहा म्हणाला, तो पीटीआयशी बोलत होता.

ADVERTISEMENT

फॉर्मात नसलेल्या चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांना निवड समितीने रणजी क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता. वृद्धीमान साहाचं वय सध्या ३७ वर्ष आहे. परंतू यापुढे संघात निवड होणार नाही असं सांगण्यात आल्यामुळेच साहाने यंदा रणजी करंडक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय.

श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, कसोटी संघातून अजिंक्य-पुजाराचा पत्ता कट

हे वाचलं का?

“टीम मॅनेजमेंटने मला सांगितलं की यापुढे आता माझा विचार संघनिवडीसाठी केला जाणार नाही. मी याबद्दल तुम्हाला फारकाही सांगू शकणार नाही कारण त्यावेळी मी संघाचा सदस्य होतो. प्रशिक्षक राहुल द्रविडनेही मला त्यावेळी निवृत्ती बद्दल विचार करण्याचा सल्ला दिला. वृद्धीमान साहाने यावेळी बोलत असताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीबद्दलही आपली नाराजी व्यक्त केली.

टीम इंडियावर आता मुंबईच्या ‘हिटमॅन’ची सत्ता, कसोटी संघाचं कर्णधारपद रोहितकडे

ADVERTISEMENT

न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटी सामन्यात मी गेल्या वर्षी नाबाद ६१ धावांची खेळी केली. तेव्हा शरीर साथ देत नव्हतं तरीही मी पेनकिलर घेऊन मैदानात उतरलो. सौरव गांगुलीने त्यावेळी मला What’s app वर मेसेज करुन अभिनंदन केलं. त्यावेळी सौरव गांगुलीने मला, तू संघातल्या तुझ्या स्थानाबद्दलची चिंता करु नकोस असंही सांगितलं. जेव्हा बोर्डाचा अध्यक्ष तुम्हाला असा मेसेज करतो तेव्हा नक्कीच तुमचा हुरुप वाढतो. पण यामध्ये इतक्या लवकर बदल कसा झाला हे मला खरंच समजलं नाही, साहाने आपली खंत बोलून दाखवली.

ADVERTISEMENT

Rohit Sharma Lifestyle : रोहित शर्माकडे दीड कोटींची तर फक्त BMW, कोट्यवधींचा आहे मालक

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT