Ind vs Eng : सुरक्षा कवच भेदून मैदानात शिरणाऱ्या Jarvo ला लंडनमध्ये अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हलच्या मैदानावर सुरु असलेला चौथा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत आला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातली मालिका जेवढी मैदानावर खेळामुळे रंगत आहे तेवढीच ही मालिका आणखी एका कारणामुळे रंगत आहे. स्वतःला टीम इंडियाला चाहता म्हणून घेणारा युट्यूबर जार्वो डॅनिअलने मैदानावरचं सुरक्षा कवच भेदत आत प्रवेश केला.

ADVERTISEMENT

दुसऱ्या दिवसाच्या खेळातही जार्वोने हे कृत्य केल्यानंतर त्याला साऊथ लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे.

चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान जार्वोने टीम इंडियाची जर्सी घालून बॉलिंग करण्याच्या जोशात थेट जॉनी बेअरस्टोला धडक दिली. याआधीही जार्वो टीम इंडियाची जर्सी घालून बॅटींग करण्यासाठी मैदानात आला होता. त्यावेळी सुरक्षारक्षकांनी त्याला बाहेर काढलं. जार्वोच्या या कृत्यानंतर यॉर्कशायर काऊंटी संघाने त्याच्यावर मैदानात प्रवेश करण्यासाठी आजन्म बंदी घातली आहे.

हे वाचलं का?

Ind vs Eng : घुसखोरी करणारा Jarvo पुन्हा मैदानात, इंग्लंडच्या बॅट्समनला येऊन धडकला…पाहा Video

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अद्याप जार्वोवर कोणतीही कारवाई केलेली नाही. सध्या कोरोना काळात दोन्ही संघाचे खेळाडू हे बायो सिक्युअर बबलमध्ये आहेत. त्यामुळे अशावेळी सुरक्षा कवच भेदून एक व्यक्ती थेट मैदानात खेळाडूंजवळ येतो हे सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याची गोष्ट आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडियाने इंग्लंडला दमदार प्रत्युत्तर देत आश्वासक कमबॅक केलं आहे. इंग्लंडने पहिल्या इनिंगमध्ये ९९ रन्सची आघाडी घेतल्यानंतर भारताने दुसऱ्या दिवसाअखेरीस एकही विकेट न गमावता ४३ रन्सपर्यंत मजल मारली आहे. भारत अजुनही ५६ रन्स मागे असल्यामुळे तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय फलंदाज इंग्लंडच्या बॉलिंग लाईन अपचा कसा सामना करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT