Smriti Mandhana: ‘मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार’, भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा खास VIDEO

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सांगली: कोरोनाची (Corona) दुसरी लाट ही अत्यंत भयंकर आहे. यावेळेस रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढत आहेच पण त्याशिवाय मृतांचा आकडा देखील वेगाने वाढत आहे. अशावेळी भारतीय महिला क्रिकेट संघातील (India women’s national cricket team) धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने देखील आता एका खास व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना विशेष आवाहन केलं आहे. यावेळी स्वत: स्मृतीने असंही म्हटलं आहे की, ‘मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार.’

ADVERTISEMENT

पाहा स्मृती मंधाना हिने नेमकं काय म्हटलं आहे:

‘मी नम्रपणे आवाहन करते की, कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या कोरोना लाटेला थोपवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. आजही अनेकजण अनावश्यक बाहेर पडतात. अनेकजण मास्कचा वापर व्यवस्थितपणे न करता मास्क गळ्यात अडकवताना दिसतात. चला, आज आपण सगळे निश्चय करुयात… मी जबाबदार, मीच माझा रक्षक, मी घरी थांबणार कोरोनाला हरवणार. मी मास्कचा योग्य पध्दतीने वापर करणार, वारवांर हात धुणार आणि सॅनिटायझरचा वापर करणार. तसंच सामाजिक अंतर देखील पाळणार. कोणतीही लक्षणे जाणवल्यास त्वरीत नजिकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधणार आणि कोरोनावर मात करणार. कोविड लस सुरक्षित आहे. आपण सुरक्षित, तर देश सुरक्षित. चला प्रशासनाला साथ देऊ, कोरोनाला फैलावण्यापासून रोखू.’ असं आवाहन स्मृती मंधाना हिने केलं आहे.

हे वाचलं का?

सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहे. अशावेळी मूळची सांगलीची असणारी स्मृती हिने आपल्या सांगलीतील आणि महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांना कोरोनाला दूर ठेवण्यासाठी आवाहन केलं आहे. यासाठी तिने हा व्हीडिओ देखील शूट केला आहे.

‘या’ 5 वेबसाइट्स कोविड रूग्णांसाठी ऑक्सिजन, बेड्स, औषध मिळवून देण्यात करतील मोठी मदत

ADVERTISEMENT

24 वर्षीय स्मृती मंधाना हिने आपल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघात आपली खास जागा बनवली आहे. स्मृतीने 56 वनडे सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. ज्यामध्ये तिने 42.58 च्या सरासरीने 2172 धावा केल्या आहेत. यावेळी तिने 18 अर्धशतकं आणि 4 शतकंही झळकावली आहेत. वनडे सामन्यात तिची 135 ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

ADVERTISEMENT

तर 78 टी-20 सामन्यात तिने 1782 धावा फटकावल्या आहेत. यात तिने आतापर्यंत 12 अर्धशतकं झळाकवली आहेत. टी-20 सामन्यात 86 ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

पुणेकरांच्या मदतीला धावून आली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर

महाराष्ट्रातील गेल्या 24 तासातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

महाराष्ट्रात मागील 24 तासात 66 हजार 159 नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 771 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.5 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 68 हजार 537 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 37 लाख 99 हजार 266 रूग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 83.69 टक्के एवढा झाला आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 68 लाख 16 हजार 75 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 45 लाख 39 हजार 553 चाचणीचे नमुने हे पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज घडीला 6 लाख 70 हजार 301 रूग्ण अॅक्टिव्ह आहेत. (follow the rules to stop corona indian cricketer smriti mandhana special video appeals to citizens of maharashtra

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT