Tokyo Paralympics स्पर्धेत भारताचं दैदिप्यमान यश, केंद्र सरकारच्या TOPS योजनेचा खेळाडूंना फायदा

मुंबई तक

जपानच्या टोकियो शहरात झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धा यंदा भारतासाठी अत्यंत चांगल्या गेल्या आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ७ पदकं जिंकत सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. यानंतर पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट करत १९ पदकं मिळवली. पॅरालिम्पिक स्पर्धेतही भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. पदकतालिकेत भारताने २४ वा क्रमांक मिळवला. ऑलिम्पिक सारख्या जागतिक पातळीवरील स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केलेल्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

जपानच्या टोकियो शहरात झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धा यंदा भारतासाठी अत्यंत चांगल्या गेल्या आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ७ पदकं जिंकत सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. यानंतर पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट करत १९ पदकं मिळवली. पॅरालिम्पिक स्पर्धेतही भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. पदकतालिकेत भारताने २४ वा क्रमांक मिळवला.

ऑलिम्पिक सारख्या जागतिक पातळीवरील स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. परंतू कोरोना काळातही केंद्र सरकारच्या TOPS योजनेअंतर्गत इतर खेळाडूंप्रमाणे पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनाही सरकारी मदत मिळाली. ज्याचा फायदा त्यांना स्पर्धेत झालेला पहायला मिळाला.

भालाफेकीत सुवर्णपदक मिळवणाऱ्या २३ वर्षी सुमीत अंतिलला नीरज चोप्रासोबत सराव करण्याची संधी मिळाली होती. “२०१८ साली काही पॅरा अॅथलिट्सनाही फिनलँडमध्ये जाऊन नीरज चोप्रासारख्या खेळाडूसोबत सराव करण्याची संधी मिळाली होती. हा सराव आमच्यासाठी मानसिक बळ देणारा ठरला. इतर खेळाडूंप्रमाणे आम्हालाही बरोबरीची वागणूक मिळत होती हे पाहून आम्हाला खरंच बरं वाटलं. यानंतर मी इटली, फ्रान्स आणि ट्युनिशीया यासारख्या देशांतील स्पर्धेत सहभागी झालो, ज्यामुळे विविध वातावरणात खेळण्याचा अनुभव मला आला. या सरावाचा फायदा मला २०२४ च्या पॅरिस पॅरालिम्पिक खेळांसाठीही होईल.”

साई (Sports Authority of India) आणि Go Sports Foundation या NGO च्या माध्यमातून सुमीतला या कालावधीत ७ लाखांची मदत करण्यात आली. ज्यातून त्याने prosthetic blade, विविध साहित्य, बायोमेट्रिक सपोर्ट खरेदी केला. थाळीफेक प्रकारात रौप्य पदक मिळवणाऱ्या योगेश कठुनियाची स्टोरी काहीशी अशीच आहे.

हे वाचलं का?