प्रत्येक सामन्याआधी झोपू शकत नव्हता Sachin Tendulkar, जाणून घ्या यावर त्याने कशी केली मात?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर आता बराच कालावधी उलटला आहे. परंजू जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या मनावर राज्य करणाऱ्या सचिनने आजही कोट्यवधी चाहते आपल्याला पहायला मिळतात. भारतात एक काळ असा होता की केवळ सचिनची बॅटींग पाहण्यासाठी घरातले आबालवृद्ध टीव्हीसमोर बसायचे. आतापर्यंत अनेक दिग्गज बॉलर्सची धुलाई करताना आपण सचिनला पाहिलेलं आहे. परंतू करिअरमधली सुरुवातीची १२ वर्ष […]
ADVERTISEMENT
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर आता बराच कालावधी उलटला आहे. परंजू जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या मनावर राज्य करणाऱ्या सचिनने आजही कोट्यवधी चाहते आपल्याला पहायला मिळतात. भारतात एक काळ असा होता की केवळ सचिनची बॅटींग पाहण्यासाठी घरातले आबालवृद्ध टीव्हीसमोर बसायचे.
ADVERTISEMENT
आतापर्यंत अनेक दिग्गज बॉलर्सची धुलाई करताना आपण सचिनला पाहिलेलं आहे. परंतू करिअरमधली सुरुवातीची १२ वर्ष सचिनला सामन्याआधी झोपच यायची नाही. कालांतराने सचिनने यावर मात केली.
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सचिनने याविषयी भाष्य केलं आहे. “तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी जर खूप विचार करत असाल तर नक्कीच तुम्हाला थोडी बेचैनी नक्कीच वाटत राहते. सुरुवातीच्या काळात मी स्वतःच्या खेळाबद्दल खूप विचार करायचो. प्रत्येक सामन्यासाठी मैदानात पाऊल ठेवल्यानंतर मला चांगलीच कामगिरी करायची आहे असं मला वाटत रहायचं. सामन्याआधी मला झोप लागायची नाही. मी उद्या बॉलर्सचा सामना कसा करेन? ते मला कशी बॉलिंग करतील, माझ्याकडे काय पर्याय असेल…मी सारखा याचा विचार करत बसायचो आणि ज्यामुळे मला झोप लागायची नाही.”
हे वाचलं का?
कालांतराने मी परिस्थितीशी जुळवून घ्यायला लागलो. मग मी माझ्या शरीराला या गोष्टींची सवय लावून घेतली. सामन्याच्या आधी रात्री मध्येच मला जाग आली, टिव्ही पहावासा वाटला, गाणी ऐकावीशी वाटली तरीही यात काही वावगं नाही. कारण माझ्या दृष्टीने उद्याच्या खेळासाठी तयार होण्याची ही एक प्रक्रीया होती. ही गोष्ट स्विकाराल्यानंतर हळुहळु गोष्टी सुरळीत झाल्या असं सचिन म्हणाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT