Ind vs Aus test: कांगारू पुन्हा फिरकीच्या जाळ्यात, ऑस्ट्रेलियाची दाणादाण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ind vs aus 2nd test score Card : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन फलंदाजांना गुडघ्यावर आणलं. कांगारूंनी भारतीय फिरकीपटूंचा मुकाबला करण्यासाठी चांगला सराव केला होता. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु कांगारूंना ज्याची भीती वाटत होती तेच दिल्लीत घडले आणि भारतीय फिरकीपटूंनी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ पहिल्याच दिवशी अवघ्या 263 धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाची सलामीवीर जोडी डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा अतिशय सावधपणे खेळत होते. सुरुवातीच्या 50 धावांपर्यंत ऑस्ट्रेलियानेही एकही गडी गमावला नाही. मात्र नंतर आक्रमक खेळीच्या प्रयत्नात ऑस्ट्रेलिय खेळाडू फिरकीच्या जाळ्यात अडकले. (india vs australia 2nd test scorecard)

ADVERTISEMENT

अश्विनच्या फिरकीत स्मिथ अडकला

ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का डेव्हिड वॉर्नरच्या रूपाने बसला. मोहम्मद शमीने वॉर्नरला श्रीकर भरतकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर लॅबुशन मैदानात आला. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या उस्मान ख्वाजाबरोबर मोठी भागीदारी करण्याच्या प्रयत्नात होता. त्यावेळी आर. अश्विनची गोलंदाजीसाठी एन्ट्री झाली. अश्विनने 18 धावांवर खेळत असलेल्या मार्नसला चालत केलं. अश्विनच्या चेंडूवर लबुशेन क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर मैदानात आला, स्टीव्ह स्मिथ. त्याच षटकात स्मिथलाही अश्विननं टिपलं. स्मिथला अश्विनचा चेंडू अजिबातच कळला नाही आणि तो शून्यावरच पॅव्हेलियनमध्ये परतला. अश्विनने एकाच षटकात दोन मोठ्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून ऑस्ट्रेलियाला चांगलाच झटका दिला.

KL Rahul: केएल राहुलने घेतलेला हा भन्नाट कॅच पाहिला का?

हे वाचलं का?

ऑस्ट्रेलियाची मधली फळी ठरली अपयशी

उस्मान ख्वाजा भारतीय फिरकीपटूंना सावधपणे खेळत होता आणि हळू हळू संघाच्या धावसंख्येत भर टाकत होता. पण दुसऱ्या टोकाकडून त्याला कुणीही साथ देऊ शकला नाही. ट्रॅव्हिस हेडही क्रीजवर आला आणि केवळ 12 धावा करून बाद झाला. राहुलने हेडचा अप्रतिम झेल घेतला. तोपर्यंत ऑस्ट्रेलियन संघाने 100 धावांचा टप्पा ओलांडला होता.

Ravichandran Ashwin: जबरदस्त! 3 चेंडूत 2 बळी, स्मिथ-लॅब्युशन दाखवला रस्ता

ADVERTISEMENT

ख्वाजा-हँड्सकॉम्बची जोडी

पडझड सुरू असताना उस्मान ख्वाजाला एका फलंदाजाने भरभरून साथ दिली. तो होता पीटर हँड्सकॉम्बची. दोघांनी 50 हून अधिक धावांची भागीदारी केली, पण ही जोडी रवींद्र जडेजाने तोडली. जाडेजाने उस्मान ख्वाजाला 167 च्या एकूण धावसंख्येवर 81 धावांवर धावबाद केले.

ADVERTISEMENT

केएल राहुलने ख्वाजाचा एका हाताने झेल घेत सर्वांनाच चकित केले. यानंतर अश्विनने यष्टिरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरीला खाते न उघडताच माघारी पाठवून संघाला सहावा धक्का दिला. पॅट कमिन्सने क्रीझवर येऊन 33 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळी केली असली, तरी त्यानंतर अन्य कोणताही फलंदाज क्रीझवर स्थिरावू शकला नाही. हँड्सकॉम्बने सर्वोत्तम प्रयत्न केले पण दुसऱ्या टोकाकडून फलंदाज बाद होत राहिले. याचा परिणाम असा झाला की संपूर्ण संघ 263 धावांत गारद झाला. 72 धावा केल्यानंतर हँड्सकॉम्ब नाबाद राहिला.

पहिल्या दिवशी पुन्हा एकदा भारतीय फिरकीपटूंचा जलवा बघायला मिळाला. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक बळी घेतले. शमीने 14.4 षटकात 4 बळी घेतले. तर आर अश्विनने ३ आणि रवींद्र जडेजाने ३ बळी घेतले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT