Ind vs Eng : पहिल्याच वन-डे मॅचमध्ये कृणालची हाफ सेंच्युरी, दिग्गज प्लेअर्सच्या पंगतीत स्थान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इंग्लंडविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने धडाकेबाज कामगिरी करत ३१७ रन्सपर्यंत मजल मारली आहे. शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल आणि कृणाल पांड्या यांच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर भारताने इंग्लंडवर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. टीम इंडियाकडून वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कृणाल पांड्याने हाफ सेंच्युरी झळकावत आपली निवड योग्य असल्याचं सिद्ध केलं. कृणालने ३१ बॉलमध्ये ७ फोर आणि २ सिक्स लगावत नॉटआऊट ५८ रन्स केल्या.

ADVERTISEMENT

या इनिंगच्या जोरावर कृणाल पांड्या वन-डे क्रिकेटमध्ये डेब्यूच्या मॅचमध्ये सर्वात जलद हाफ सेंच्युरी करणारा प्लेअर ठरला आहे. २६ बॉलमध्ये कृणालने ही कामगिरी करुन दाखवली.

याचसोबत कृणालने आपल्या पहिल्याच इनिंगमध्ये अनेक विक्रम करत दिग्गजांच्या पंगतीत स्थान मिळवलं.

हे वाचलं का?

इंग्लंडचा कॅप्टन मॉर्गनने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी टीमला चांगली सुरुवात करुन दिली. शिखर धवनने टी-२० सिरीजमधलं आपलं अपयश पुसून काढत ९८ रन्सची इनिंग खेळली. बेन स्टोक्सच्या बॉलिंगवर तो आऊट झाला. यानंतर विराट कोहलीनेही ५६ तर लोकेश राहुलने ६२ रन्स काढत भारतीय संघाची बाजू वरचढ ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT