Ind vs Eng : Lord’s च्या मैदानावर चमकला लोकेश राहुल, विक्रमी शतकासह इंग्लंडला जोरदार प्रत्युत्तर
टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुलने लॉर्ड्सच्या मैदानावर दणक्यात पुनरागमन केलं आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या बॉलिंग लाईन अपचा सामना करताला लोकेश राहुलने शतकी खेळी केली. रोहित शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी १२६ रन्सची पार्टनरशीप केल्यानंतर लोकेश राहुलने मैदानावर टिकून राहत शतकाला गवसणी घातली. पहिल्या कसोटी सामन्यातही लोकेश राहुलचं शतक हुकलं होतं. त्यामुळे लॉर्ड्सच्या मैदानावर हाराकिरी […]
ADVERTISEMENT
टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुलने लॉर्ड्सच्या मैदानावर दणक्यात पुनरागमन केलं आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या बॉलिंग लाईन अपचा सामना करताला लोकेश राहुलने शतकी खेळी केली. रोहित शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी १२६ रन्सची पार्टनरशीप केल्यानंतर लोकेश राहुलने मैदानावर टिकून राहत शतकाला गवसणी घातली.
ADVERTISEMENT
पहिल्या कसोटी सामन्यातही लोकेश राहुलचं शतक हुकलं होतं. त्यामुळे लॉर्ड्सच्या मैदानावर हाराकिरी न करता राहुलने संयमीपणे सामना करत शतक केलं.
या शतकी खेळीसोबत राहुलने अनेक विक्रम आपल्या नावे जमा केले आहेत. जाणून घेऊयात या विक्रमांची यादी…
हे वाचलं का?
Indian Openers Scoring test century at Lord's
Vinoo Mankad (1952)
Ravi Shastri (1990)
KL Rahul (2021)*#INDvENG— CricBeat (@Cric_beat) August 12, 2021
Since 2000
Indian Openers with most test 100s in SENA Countries
3 – KL Rahul*
2 – Virender Sehwag
2 – Gautam Gambhir
2 – Rahul Dravid
2 – Murali Vijay#INDvENG— CricBeat (@Cric_beat) August 12, 2021
Indian Openers With Most Test Centuries In England
Vijay Merchant – 2
Sunil Gavaskar – 2
Ravi Shastri – 2
Rahul Dravid – 2
KL Rahul – 2*#INDvENG— ComeOn Cricket ??? (@ComeOnCricket) August 12, 2021
लोकेश राहुलच्या दृष्टीकोनातून हे शतक खूप महत्वाचं आहे. दोन वर्षांपूर्वी खराब कामगिरीमुळे कसोटी संघातून स्थान गमावलेल्या लोकेशने नंतर भारतीय संघात पुनरागमन केलं. परंतू कसोटी संघात त्याला जागा मिळवता येत नव्हती. इंग्लंड दौऱ्यात शुबमन गिल आणि मयांक अग्रवालला झालेल्या दुखापतीमुळे लोकेशला भारतीय संघात संधी मिळाली. पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात बहारदार इनिंग खेळत लोकेशने आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करुन दाखवलं आहे.
KL Rahul is only the second Indian opener to score a century on the first day of a Test outside Asia after the opposition put India in to bat first.
The only other Indian opener to do so is Navjot Singh Sidhu (116 v West Indies at Kingston in 1989).#ENGvIND #INDvENG
— Rajneesh Gupta (@rgcricket) August 12, 2021
Most 100s by Indian openers outside Asia:
15 Sunil Gavaskar (81 inns)
4 Virender Sehwag (59 inns)
4 KL Rahul (28 inns)#ENGvIND #INDvENG— Rajneesh Gupta (@rgcricket) August 12, 2021
Last five Test centuries by Indian openers 'away' from home since 2016…
3* – KL Rahul (all away from Asia)
2 – Shikhar Dhawan (both in Sri Lanka)#EngvInd#EngvsInd#IndvEng https://t.co/8i903wXXxS— Mohandas Menon (@mohanstatsman) August 12, 2021
KL Rahul now becomes the third Indian to score a Test 100 at the Oval and also at Lord's (both in London) after Ravi Shastri and Rahul Dravid.#ENGvIND#ENGvsIND
— Mohandas Menon (@mohanstatsman) August 12, 2021
पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात लोकेश राहुलने पहिल्या विकेटसाठी रोहित शर्मासोबत शतकी भागीदारी करुन भारताला चांगली सुरुवात करुन दिली. जेम्स अँडरसनने रोहित आणि पुजाराला आऊट केल्यानंतरही राहुल मैदानावर टिकून राहिला आणि विराटच्या साथीने त्याने आपलं शतक पूर्ण केलं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारत किती धावसंख्येपर्यंत मजल मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT