Ind vs Eng 3rd Test : पहिला दिवस इंग्लंडचा, टीम इंडिया बॅकफूटवर
लॉर्ड्स कसोटीत ऐतिहासीक विजयाची नोंद केल्यानंतर भारतीय संघाची गाडी लगेच पुढच्या सामन्यात रुळावरुन खाली घसरलेली पहायला मिळाली. लीड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने खेळावर आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. भारताला पहिल्या डावात अवघ्या ७८ धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या दिवशी एकही विकेट न गमावता १२० रन्सपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडे दिवसाअखेरीस ४२ धावांची आघाडी आहे. सलामीवीर रोरी बर्न्स […]
ADVERTISEMENT
लॉर्ड्स कसोटीत ऐतिहासीक विजयाची नोंद केल्यानंतर भारतीय संघाची गाडी लगेच पुढच्या सामन्यात रुळावरुन खाली घसरलेली पहायला मिळाली. लीड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने खेळावर आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. भारताला पहिल्या डावात अवघ्या ७८ धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या दिवशी एकही विकेट न गमावता १२० रन्सपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडे दिवसाअखेरीस ४२ धावांची आघाडी आहे.
ADVERTISEMENT
सलामीवीर रोरी बर्न्स आणि हासिब हमीद यांनी एक अख्खं सत्र खेळून काढत सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली. लॉर्ड्स कसोटीत भारतासमोर लोटांगण घालणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजांनी तिसऱ्या डावात परिपक्व खेळ केला. दिवस संपला तेव्हा रोरी बर्न्स ५२ रन्सवर तर हासिब हमीद ६० रन्सवर खेळत होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सामन्यात कमबॅक करण्यासाठी भारताला कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे.
त्याआधी टॉस जिंकून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पहिले बॅटींगचा निर्णय घेतला. लॉर्ड्स कसोटीत शतक झळकावणारा लोकेश राहुल जेम्स अँडरसनच्या पहिल्याच ओव्हरवर शून्यावर आऊट झाला. यानंतर ठराविक अंतराने अँडरसनने चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीलाही आपल्या जाळ्यात अडकवलं. ३ बाद २१ अशा परिस्थितीत अडकलेल्या भारतीय संघाला यानंतर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकरांनी सावरलं.
हे वाचलं का?
दोन्ही फलंदाजांनी मैदानावर जम बसवण्याचा प्रयत्न करुन छोटेखानी भागीदारी रचली. बिनीचे शिलेदार माघारी परतल्यानंतर रोहित शर्माने मैदानावर संयम दाखवून भारताला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतू रॉबिन्सनने अजिंक्य रहाणेला आऊट करत भारताच्या अडचणी आणखी वाढवल्या. दुसऱ्या सत्रातही भारताची ही घसरगुंडी अशीच सुरु राहिली. ऋषभ पंत माघारी परतल्यानंतर इतके तास संयम दाखवणाऱ्या रोहितचाही तोल ढळला आणि त्याने ओव्हर्टनच्या बॉलिंगवर खराब फटका खेळत आपली विकेट फेकली.
यानंतर भारताचे उर्वरित फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले. एकामागोमाग एक पत्त्यांचा बंगला कोसळावा तसा भारताचा उर्वरित डाव ७८ धावांवर संपला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हर्टन यांनी प्रत्येकी ३-३ तर रॉबिन्सन आणि करन यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT