IND vs ENG: टीम इंडियाने 13 वर्षांनंतर करून दाखवली कमाल, इंग्लंडला काही सुचेना...
IND vs ENG 3rd ODI Match Highlights: भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या ODI मालिकेतील शेवटचा सामना बुधवारी अहमदाबादमध्ये खेळवण्यात आला. भारतीय संघाने हा सामना सहज जिंकला. यासह, इंग्लंडला मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप दिला.
ADVERTISEMENT

IND vs ENG 3rd ODI Match Highlights: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अगदी आधी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने उत्तम खेळ दाखवला आहे. घरच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाने इंग्लंडला 3-0 असा क्लीन स्वीप दिला. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी (12 फेब्रुवारी) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला.
भारतीय संघाने हा सामना 142 धावांनी जिंकला. यापूर्वी टीम इंडियाने मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना 4 विकेट्सने जिंकला होता. अशाप्रकारे, त्यांनी 13 वर्षांनंतर द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत इंग्लंडला क्लीन स्वीप केले आहे.
हे ही वाचा>> Ind vs Eng : सचिन-विराटला जमलं नाही, ते गिलनं करून दाखवलं! 'हा' कारनामा करून रचला इतिहास
यापूर्वी ऑक्टोबर 2011 मध्ये भारतीय संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत इंग्लंड संघाला 5-0 ने क्लीन स्वीप केलं होतं. त्यावेळी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. यावेळीही असेच काहीसे घडले आहे. पण यावेळी मालिकेत फक्त 3 एकदिवसीय सामने होते.
इंग्लंडविरुद्ध भारताचा सर्वात मोठा एकदिवसीय विजय (धावांनी)
158 - राजकोट, 2008
142 - अहमदाबाद, 2025
133 - कार्डिफ, 2014
127 - कोची, 2013
126 - हैदराबाद, 2011










