Ind vs SL : लंकेने व्हाईटवॉशची नामुष्की टाळली, ३ विकेट राखून भारतावर मात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर यजमान श्रीलंकेने वन-डे सिरीजमध्ये व्हाईटवॉशची नामुष्की टाळली आहे. तिसऱ्या वन-डे सामन्यात श्रीलंकेने भारतावर ३ विकेट राखून मात करत मालिकेचा शेवट गोड केला.

ADVERTISEMENT

अकीला धनंजय आणि प्रवीण जयविक्रमा यांच्या माऱ्याच्या जोरावर श्रीलंकेने भारताला २२५ धावांवर रोखलं. यानंतर अविष्का फर्नांडो आणि भानुका राजपक्षा यांच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर श्रीलंकेने सामन्यात बाजी मारली. भारताने ३ वन-डे सामन्यांची मालिका २-१ च्या फरकाने जिंकली आहे.

पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात संघात ६ बदल करत नवीन खेळाडूंना संधी दिली. शिखर धवनने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. परंतू तुलनेने नवोदीत खेळाडूंना घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची डाळ या सामन्यात शिजली नाही. पृथ्वी शॉ, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव यांचा अपवाद वगळता इतर सर्व बॅट्समन अपयशी ठरले.

हे वाचलं का?

पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात श्रीलंकेने भारताला २२५ धावांवर रोखण्यात यश मिळवलं. भारताकडून पृथ्वी शॉने सर्वाधीक ४९ रन्स केल्या तर श्रीलंकेकडून धनंजय आणि जयविक्रमा यांनी प्रत्येकी ३-३ तर चमीराने २ आणि करुणरत्ने-शनकाने १-१ विकेट घेतली.

प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेने आश्वासक सुरुवात केली. कृष्णप्पा गौथमने मिनोद भनुकाला आऊट करुन भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर अविष्का फर्नांडो आणि भानुका राजपक्षा यांनी यशस्वी भागीदारी रचत श्रीलंकेचा डाव सावरला. अर्धशतकी खेळी करणाऱ्या भानुका राजपक्षाला नवोदीत चेतन साकरीयाने आऊट केलं. राजपक्षाने ६५ रन्स केल्या. अखेरपर्यंत मैदानात टिकून राहिलेल्या फर्नांडोलाही चहरने ७६ रन्सवर आऊट करत सामन्यात रंगत आणली. परंतू श्रीलंकेच्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी विजयासाठी आवश्यक असलेल्या रन्स पूर्ण करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताकडून राहुल चहरने ३, चेतन सकारियाने २ तर कृष्णप्पा गौथम आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT