भारतीय संघाच्या आनंदावर विरजण, ICC ने ठोठावला दंड

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर दुसऱ्या टी-२० मध्ये इशान किशन आणि विराट कोहली यांच्या धडाकेबाज हाफ सेंच्युरीच्या जोरावर भारताने दमदार कमबॅक केलं. परंतू षटकांची गती कायम न राखता आल्यामुळे (Slow over rate) ICC ने भारतीय संघाला दंड ठोठावला आहे. भारतीय खेळाडूंच्या मानधनातली २० टक्के रक्कम कापून घेण्यात येणार आहे. कोरोना प्रादुर्भावानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर स्लो ओव्हर रेटसाठी भारतीय संघाला शिक्षा होण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे.

ADVERTISEMENT

मॅच रेफ्री जवागल श्रीनाथ यांनी विराट कोहलीच्या भारतीय संघाला हा दंड ठोठावला आहे. ICC च्या Article 2.22 चा टीम इंडियाने भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला. दरम्यान आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळणाऱ्या इशान किशनला त्याच्या अर्धशतकी खेळासाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

रोहित लालची, विराट कोहली रागीट…जाणून घ्या धोनी असं का म्हणाला?

हे वाचलं का?

विराटने ४९ बॉलमध्ये ५ फोर आणि ३ सिक्स लगावत नॉटआऊट ७३ रन्सची इनिंग खेळली. या दरम्यान कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ३ हजार रन्सचा टप्पाही पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा विराट कोहली हा पहिला खेळाडू ठरला आहे. सलग दुसऱ्या मॅचमध्ये लोकेश राहुल स्वस्तात आऊट झाल्यामुळे टीम इंडियाची सुरुवात खराब झाली होती. त्यामुळे भारतीय संघ हे आव्हान पेलवू शकेल का अशी शंकाही निर्माण झाली होती. परंतू विराटने सर्वात आधी इशान किशन आणि त्यानंतर पंत व श्रेयस अय्यरसोबत महत्वाची पार्टनरशीप करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

त्याआधी, टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. जोस बटलरला शून्यावर आऊट करत भारताने चांगली सुरुवात केली. यानंतर जेसन रॉय आणि ड्वाइड मलानने चांगली पार्टनरशीप करत इंग्लंडच्या डावाला आकार दिला. युजवेंद्र चहलने मलानला आऊट करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. यानंतर मधल्या फळीत इंग्लंडचे बॅट्समन ठराविक अंतराने आऊट होत गेले. अखेरीस इंग्लंडचा संघ १६४ रन्सपर्यंत पोहचू शकला. इंग्लंडकडून जेसन रॉयने ४६ रन्सची इनिंग खेळली. भारताकडून शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी २-२ तर भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहलने १-१ विकेट घेतली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT