Tokyo Olympic 2021 : जाणून घ्या भारताकडून आतापर्यंत कोणाला मिळालं टोकियोचं तिकीट?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

२०२० साली कोरोनाचा फटका संपूर्ण जगाला बसला. यामुळे टोकियोत होणारं ऑलिम्पिक स्थगित करण्यात आलं. ही स्पर्धा स्थगित झाल्यामुळे जपानला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं. त्यामुळे यंदाच्या वर्षात ही महत्वाची स्पर्धा पुन्हा एकदा जपानच्या टोकियो शहरात भरवली जाणार आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता कडेकोट बंदोबस्त आणि निर्बंधांसह ही स्पर्धा खेळवली जाईल.

ADVERTISEMENT

ऑलिम्पिक ही क्रीडा क्षेत्रातली मानाची स्पर्धा मानली जाते. दुर्दैवाने या स्पर्धेत भारताची आतापर्यंत कामगिरी फारशी आश्वासक राहिलेली नाही. यंदा २३ जुलैपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून आतापर्यंत भारताने विविध क्रीडा प्रकारात १०० पेक्षा जास्त खेळाडूंना या स्पर्धेसाठी संधी दिली आहे. जाणून घेऊयात कोण आहेत हे खेळाडू.

शूटींग (नेमबाजी) –

हे वाचलं का?

  • १० मी. एअर रायफल – (महिला) : अंजुम मुद्गील, अपुर्वी चंदेला

  • १० मी. एअर रायफल – (पुरुष) : दिव्येश सिंग परमार, दीपक कुमार

  • ADVERTISEMENT

  • १० मी. एअर पिस्तुल – (महिला) : मनू भाकेर, यशस्विनी सिंग देसवाल

  • ADVERTISEMENT

  • १० मी. एअर पिस्तुल – (पुरुष) : सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा

  • २५ मी. पिस्तुल – (महिला) : राही सरनौबत, एल्वेनिल वलारिवन

  • ५० मी. रायफल थ्री पोजिशन – (महिला) : तेजस्विनी सावंत

  • ५० मी. रायफल थ्री पोजिशन – (पुरुष) : संजीव राजपूत, ऐश्वर्य प्रतापसिंह तोमर

  • स्कीट (पुरुष) : अंगद विरसिंग बाजवा, माइराज अहमद खान

  • कुस्ती –

    महिला फ्रिस्टाईल – सिमा बिस्ला (५० किलो), विनेश फोगट (५३ किलो), अंशु मलिक (५७ किलो), सोनम मलिक (६२ किलो)

    पुरुष फ्रिस्टाईल – रवी कुमार दहिया (५७ किलो), बजरंग पुनिया (६५ किलो), दीपक पुनिया (८६ किलो)

    हॉकी – भारताच्या महिला आणि पुरुष असे दोन्ही संघ यंदाच्या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत

    बॅडमिंटन –

    • महिला एकेरी – पी.व्ही. सिंधू

    • पुरुष एकेरी – बी. साई प्रणीत

    • पुरुष दुहेरी – सात्विकसाईराज रणकीरेड्डी, चिराग शेट्टी

    तिरंदाजी –

    • Men’s Recurve – अतानु दास, तरुणदीप राय, प्रवीण जाधव

    • Women’s Recurve – दीपिका कुमारी

    बॉक्सिंग –

    महिला संघ – मेरी कोम (५१ किलो), सिमरनजीत कौर (६० किलो), लोवलिना बोरगोहैन (६९ किलो), पुजा राणी (७५ किलो)

    पुरुष संघ – अमित पांघल (५२ किलो), मनिष कौशिक (६३ किलो), विकास क्रिशन (६९ किलो), आशिष कुमार (७५ किलो), सतीश कुमार (९१ किलो)

    वेटलिफ्टींग –

    मिराबाई चानु

    अॅथलेटिक्स –

    • भालाफेक – नीरज चोप्रा, शिवपाल सिंग

    • ३००० मी. स्टिपलचेस – अविनाश साबळे

    • उंच उडी (पुरुष) – मुरली श्रीशंकर

    • ४०० मी. हर्डल (पुरुष) – एम.पी.जबीर

    • गोळाफेक – तेजिंदरपाल सिंग तूर

    • थाळीफेक – कमलप्रीत कौर, सीमा पुनिया

    • भालाफेक (महिला) – अनु राणी

    • १०० मी, २०० मी शर्य महिला – द्युती चंद

    • २० किमी. रेस वॉकिंग (पुरुष) – के.टी. इरफान, संदीप कुमार, राहुल रोहिलीया

    • २० किमी. रेस वॉकिंग (महिला) – भावना जट, प्रियांका गोस्वामी

    • ४ * ४०० पुरुष रिले आणि ४ * ४०० मिश्र रिले

    घोडेस्वारी – फवाद मिर्झा

    तलवारबाजी – भवानी देवी

    गोल्फ – अनिर्बान लहिरी, उदयन माने, आदिती अशोक

    जिमनॅस्टिक – प्रणिती नायक

    ज्युडो – सुशीला देवी

    रोविंग – अरुण जाट आणि अरविंद सिंग

    सेलिंग –

    • नेत्रा कुमनम, लासेर राडीयल

    • विष्णु सर्वनन, लासेर

    • के.सी.गणपती आणि वरुण ठक्कर

    जलतरण –

    • २०० मी. बटरफ्लाय (पुरुष) – सजन प्रकाश

    • १०० मी. बॅकस्ट्रोक (पुरुष) – श्रीहरी नटराजन

    • १०० मी. बॅकस्ट्रोक (महिला) – माना पटेल

    टेबल टेनिस –

    शरथ कमल, सत्यन गणशेखरन

    सुत्रिथा मुखर्जी, मनिका बत्रा

    याव्यतिरीक्त शरथ कमल आणि मनिका बत्रा ही जोडी मिश्र दुहेरी सामन्यांसाठी उतरेल

    टेनिस –

    महिला दुहेरी – सानिया मिर्झा आणि अंकीता रैना

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT