भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर शिक्कामोर्तब, २६ डिसेंबरपासून सुरु होणार मालिका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नियोजीत वेळापत्रकानुसार भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार होता. १७ डिसेंबरपासून नियोजीत वेळापत्रकानुसार या मालिकेला सुरुवात होणार होती. ज्यात दोन्ही संघ ३ कसोटी, ३ वन-डे आणि ४ टी-२० सामने खेळणार होते.

ADVERTISEMENT

परंतू ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाशी संपर्क साधून टी-२० मालिका नंतर खेळण्याचा तोडगा काढला आहे. त्यामुळे टीम इंडियाचा यंदाचा दक्षिण आफ्रिका दौरा ३ कसोटी आणि ३ वन-डे सामन्यांचा असणार आहे. टीम इंडिया निजोयीत वेळापत्रकानुसार दक्षिण आफ्रिकेत खेळण्यासाठी कटीबद्ध असल्याचं बीसीसीआयने सांगितलं आहे.

Omicron ची भीती, टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यात बदल; टी-२० सामने नंतर खेळवणार

हे वाचलं का?

परंतू सध्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे तयार झालेली परिस्थिती पाहता या दौऱ्यात बदल करणं गरजेचं असून याबद्दल दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाशी चर्चा झाल्याचंही बीसीसीआयने सांगितलं. या दौऱ्यात सर्व खेळाडू हे कठोर बायो सिक्युअर बबलमध्ये वावरणार आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी विशेष चार्टर्ड विमानाची सोय केली जाणार असल्याचंही बीसीसीआयने सांगितलं आहे.


ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT