Asia cup 2023 : आशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान कधी भिडणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

india vs pakistan asia cup 2023 schedule update ind vs pak match date venue
india vs pakistan asia cup 2023 schedule update ind vs pak match date venue
social share
google news

India vs Pakistan Asia Cup 2023, Date,Venue : आशिया कपच्या (Asia Cup 2023) वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. ACC चे अध्यक्ष जय शाह यांनी ट्विट करून हे वेळापत्रक जारी केले आहे. या वेळापत्रकानुसार आशिया कपमध्ये भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. या सामन्यासोबतच भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) आणखीण दोनदा या स्पर्धेत आमने-सामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्सला हायव्होल्टेज सामन्याची हट्ट्रीक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.(india vs pakistan asia cup 2023 schedule update ind vs pak match date venue)

ADVERTISEMENT

एशियन क्रिकेट काऊंसिलने नुकतीच आशिया कपच्या तारखांची घोषणा केली होती. यंदाच्या वर्षी हायब्रिड मॉडेलनुसार आशिया कप होणार आहे. आशिया कपच्या यजमानपदी असलेल्या पाकिस्तानात फक्त 4 सामने होणार आहेत, तर इतर 9 सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.

भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) आशिया कपच्या एकाच ग्रुपमध्ये आहेत. या ग्रुपमध्ये भारत-पाकिस्तानसोबत नेपाल देखील आहे. अशा परीस्थितीत पहिला सामना ग्रुप स्टेजमध्ये होणार आहे. याशिवाय भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये पात्र ठरणार हे जवळपास निश्चित आहे. सुपर-4 सामने राऊंड रॉबिन अंतर्गत खेळवले जातील. त्यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये आणखीण एक सामना होण्याची शक्यता आहे. जर भारत-पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचली तर तिसरी टक्कर अंतिम सामन्यात होण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Ind vs wi: टेस्ट डेब्यूत जयस्वालची ‘यशस्वी’ कामगिरी! क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरचा मोडला रेकॉर्ड

एशिया कप ग्रुप

ग्रुप-A: भारत, पाकिस्तान आणि नेपाल.
ग्रुप-B: श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगानिस्तान

आशिया कप वेळापत्रक

30 ऑगस्ट : पाकिस्तान वि. नेपाल- मुल्तान
31 ऑगस्ट : बांग्लादेश वि. श्रीलंका-कॅंडी
2 सप्टेंबर : भारत वि. पाकिस्तान-कॅंडी
3 सप्टेंबर : बांग्लादेश वि. अफगाणिस्तान-लाहोर
4 सप्टेंबर : भारत वि. नेपाल-कॅंडी
5 सप्टेंबर : श्रीलंका वि. अफगाणिस्तान-लाहोर

ADVERTISEMENT

सुपर 4 स्टेज शेड्यूल

6 सप्टेंबर : A1 Vs B2 – लाहोर
9 सप्टेंबर : B1 vs B2 – कोलंबो ( श्रीलंका वि. बांग्लादेश होण्याची शक्यता)
10 सप्टेंबर : A1 vs A2 – कोलंबो (भारत वि. पाकिस्तान होण्याची शक्यता)
12 सप्टेंबर : A2 vs B1 – कोलंबो
14 सप्टेंबर : A1 vs B1 – कोलंबो
15 सप्टेंबर : A2 vs B2 – कोलंबो
17 सप्टेंबर : फायनल – कोलंबो

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ind vs Wi: ‘या वयात म्हणजे काय? मी अजूनही….’, अजिंक्य रहाणे भडकला

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT