Ind vs SL 1st Test : जाडेजाने रचला इतिहास! भारताने श्रीलंकेला दिला ‘फॉलोऑन’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करत श्रीलंकेला फॉलोऑन दिला. भारताने पहिल्या डावात ५७४ धावा करत डाव घोषित केला होता. तर श्रीलंकेचा संपूर्ण संघ १७४ धावांमध्येच गारद झाला. तडाखेबंद दीडशतकी खेळी करणाऱ्या जाडेजाने गोलंदाजीतही कमाल करत इतिहास रचला.

ADVERTISEMENT

पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने ५७४ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर खेळण्यास आलेल्या श्रीलंकेनं दिवसअखेर ४ गडी बाद १०८ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर श्रीलंकेला १६१ धावांवर ५ झटका बसला.

२९ धावांवर खेळत असलेल्या चरिथ असालंकाला जसप्रित बुमराहने पायचित करत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर श्रीलंकेच्या धावसंख्येत ३ धावांची भर पडलेली असतानाच रवींद्र जाडेजाने भारताला आणखी एक यश मिळवून दिलं. त्याच षटकात जाडेजाने सुरंगा लकमल याला बाद केलं.

हे वाचलं का?

भारतीय गोलंदाजासमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारल्यासारखीचं स्थिती बघायला मिळाली. श्रीलंकेला पहिल्या डावात सर्व बाद १७४ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून रवींद्र जाडेजाने ४१ धावा देत ५ गडी बाद केले. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. शमीने एक गडी बाद केला.

पहिल्या डावात श्रीलंकेचा संपूर्ण संघ १७४ धावांमध्ये गारद झाल्याने भारताला ४०० धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावातही श्रीलंकेला सुरूवातीलाच झटका बसला. संघाची धावसंख्या ९ असताना रविचंद्रन अश्विनने थिरामानेला बाद केलं.

ADVERTISEMENT

रवींद्र जाडेजा चमकला

ADVERTISEMENT

श्रीलंकेविरुद्ध मोहालीत सुरू असलेल्या पहिल्या कसोटी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने लक्षवेधी कामगिरी केली. रवींद्र जाडेजाने पहिल्या डावात खेळताना १७५ धावांची नाबाद खेळी केली. तर गोलंदाजीतही कमाल करत श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना टिपले. जाडेजाने अवघ्या १३ षटकात ४१ धावा देत ही कामगिरी केली. १३ षटकांपैकी ४ निर्धाव आहेत. अशी कामगिरी करणारा जाडेजा हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT