ind vs wi 2nd t20 : रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय; टी20 मालिका खिशात
अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने रोमहर्षक विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने एकदिवसीय मालिकेबरोबर टी20 चषकही खिशात टाकला. विराट कोहलीला गवसेला सूर, ऋषभ पंतने केलेली निर्णायक खेळी आणि अखेरच्या षटकात हर्षल पटेलने केलेल्या गोलंदाजीच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजला पराभवाची धुळ चारली. त्यामुळे निकोलस पूरनने केलेली अर्धशतकी खेळी निष्फळ ठरली. नाणेफेक जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजने प्रथम […]
ADVERTISEMENT

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने रोमहर्षक विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने एकदिवसीय मालिकेबरोबर टी20 चषकही खिशात टाकला. विराट कोहलीला गवसेला सूर, ऋषभ पंतने केलेली निर्णायक खेळी आणि अखेरच्या षटकात हर्षल पटेलने केलेल्या गोलंदाजीच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजला पराभवाची धुळ चारली. त्यामुळे निकोलस पूरनने केलेली अर्धशतकी खेळी निष्फळ ठरली.
नाणेफेक जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात मात्र, निराशाजनक झाली. संघाच्या अवघ्या १० धावा झालेल्या असताना सलामीवीर ईशान किशन (१० चेंडूत २ धावा) तंबूत परतला. ईशांत किशन तंबूत परल्यानंतर खेळण्यास आलेल्या विराट कोहलीच्या साथीने रोहित शर्माने डाव सावरला. पहिल्या सामन्यात झटपट धावा करणाऱ्या रोहित शर्माला आज १९ धावा करून बाद झाला.
??#TeamIndia @Paytm #INDvWI pic.twitter.com/NjrkDCxt2q
— BCCI (@BCCI) February 18, 2022
सूर्यकुमार यादवला मोठी खेळी करता आली नाही. धावसंख्या ७२ असताना सूर्यकुमार यादव अवघ्या ८ धावांवर झेलबाद झाला. भारताने तीन गडी गमावलेले असताना दुसऱ्या बाजूने विराट कोहलीने ४१ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने अर्धशकत साकारलं. ऋषभ पंत कोहलीची जोडीचा जम बसल्याचं वाटत असताना कोहलीही बाद झाला.
त्यानंतर ऋषभ पंतने व्यंकटेश अय्यरच्या मदतीने डाव सावरला. ऋषभ पंतने २८ चेंडूत नाबाद ५२ धावा केल्या, तर व्यंकटेश अय्यरने झटपट ३३ धावा फटकावल्या. विराट कोहली, ऋषभ पंत आणि व्यंकटेश अय्यरच्या खेळीच्या बळावर भारताने २० षटकात ५ बाद १८६ धावा केल्या.









