IND vs NZ T20 : फिरकीपटूंचे वर्चस्व! दुसरा सामना जिंकत भारताचे दमदार पुनरागमन
IND vs NZ 2nd T20 News : लखनौ : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना ६ विकेट्सने जिंकत भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत दमदार पुनरागमन केलं आहे. फिरकीपटूंच्या दमदार कामगिरीच्या बळावर न्यूझीलंडला कमी धावसंख्येवर रोखण्यात भारतानं यश मिळवलं होतं. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी सामन्याला विजयी स्वरुप दिलं. भारताकडून अर्शदीपने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर चहल, कुलदीप, […]
ADVERTISEMENT
IND vs NZ 2nd T20 News :
ADVERTISEMENT
लखनौ : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना ६ विकेट्सने जिंकत भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत दमदार पुनरागमन केलं आहे. फिरकीपटूंच्या दमदार कामगिरीच्या बळावर न्यूझीलंडला कमी धावसंख्येवर रोखण्यात भारतानं यश मिळवलं होतं. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी सामन्याला विजयी स्वरुप दिलं. भारताकडून अर्शदीपने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर चहल, कुलदीप, हुड्डा, सुंदर आणि हार्दिक यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने सर्वाधिक १९ धावा केल्या.
सुरुवातीला न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यझीलंडने संघात कोणताही बदल केला नव्हता. तर भारतीय संघने उमरान मलिकच्या जागी युझवेंद्र चहलला संधी दिली होती. मिळालेल्या संधीचं सोनं करत चहलने भारताला पहिले यश मिळवून दिले. चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने फिन अॅलनला बोल्ड केले. यानंतर वॉशिंग्टन सुंदरने डेव्हॉन कॉनवेला झेलबाद केले.
हे वाचलं का?
Ind vs Eng W-U19 : भारताची कमाल! इंग्लंडला लोळवत विश्वचषकावर कोरलं नाव
दीपक हुड्डाने ग्लेन फिलिप्सला बाद करत न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. तर कुलदीप यादवने डॅरिल मिशेलला क्लीन बोल्ड केले. अर्शदीपने १८व्या षटकात २ विकेट घेतल्या. कर्णधार मिचेल सँटनरने सर्वाधिक १९ धावा केल्या. तर जेकब डफीने सहा धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर चहल, कुलदीप, हुड्डा, सुंदर आणि हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
ADVERTISEMENT
IND vs NZ T20: वॉश्गिंटनची शर्थ पण ‘सुंदर’ खेळी व्यर्थ, इंडिया पराभूत
ADVERTISEMENT
प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचीही सुरुवात खराब झाली. शुभमन गिल ९ चेंडूत ११ धावा करून बाद झाला. त्यापाठोपाठ काही वेळातच इशान किशनही धावबाद झाला. त्याने ३२ चेंडूत १९ फटकावल्या. ड्रिंक्स ब्रेकनंतर 11व्या षटकात ईश सोधीने राहुल त्रिपाठी बाद करत भारताला तिसरा धक्का दिला. संघ ७० धावांवर असतानाच वॉशिंग्टन सुंदरही धाबबाद झाला. त्यानंतर मैदानात असलेल्या सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार फलंदाजी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT