आशिया कपच्या फायनलमध्ये भारतीय महिला टीमचा दबदबा; श्रीलंकेला हरवून सातव्यांदा नावावर केलं चषक
India vs Sri Lanka Women’s Asia Cup Final: भारतीय महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा आशिया चषकात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महिला आशिया चषक 2022 चा अंतिम सामना शनिवारी (15 ऑक्टोबर) भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. यामध्ये टीम इंडियाने श्रीलंकन संघाचा 8 विकेट्सनी पराभव केला. 8 पैकी 7 वेळा भारतीय महिला संघानं आशिया कपवर […]
ADVERTISEMENT
India vs Sri Lanka Women’s Asia Cup Final: भारतीय महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा आशिया चषकात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महिला आशिया चषक 2022 चा अंतिम सामना शनिवारी (15 ऑक्टोबर) भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. यामध्ये टीम इंडियाने श्रीलंकन संघाचा 8 विकेट्सनी पराभव केला.
ADVERTISEMENT
8 पैकी 7 वेळा भारतीय महिला संघानं आशिया कपवर नाव कोरलं
श्रीलंकेच्या पराभवासह भारतीय महिला संघाने आशिया चषकाच्या इतिहासात 7व्यांदा विजेतेपद पटकावले आहे. तर मोठी गोष्ट म्हणजे आशिया चषकाचे आतापर्यंत फक्त 8 हंगाम झाले आहेत. म्हणजेच एक हंगाम वगळता प्रत्येक वेळी भारतीय संघ चॅम्पियन ठरला आहे. बांगलादेशने गेल्या वेळी एक हंगाम जिंकला होता.
हे वाचलं का?
भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकनं फलंदाजांनी गुडघे टेकले
यावेळी महिला आशिया चषक यजमान बांगलादेशमध्ये खेळला गेला. फायनलसह सर्व सामने सिल्हेटमध्ये खेळले गेले. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो सपशेल चुकीचा ठरला. श्रीलंकेचा एकही फलंदाज भारताच्या भारतीय गोलंदाजांच्या कहरसमोर टिकला नाही. श्रीलंकेने 9 धावांत दोन गडी गमावले आणि दोघेही धावबाद झाले होते.
ADVERTISEMENT
म्हणजेच क्षेत्ररक्षणातही भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. यानंतर वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने 3 खेळाडूंची शिकार करून श्रीलंकेचा संघ पूर्णपणे गुडघ्यावर आणला. उर्वरित काम फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांनी केले. या दोघांनी 2-2 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
ADVERTISEMENT
श्रीलंकन संघाचे 9 फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत
अशाप्रकारे श्रीलंकेचा संघ 9 गडी गमावून केवळ 65 धावा करू शकला. यामध्ये रणवीराने 18 आणि ओशाडी रणसिंघेने 13 धावा केल्या. याशिवाय श्रीलंकेच्या संघाचे उर्वरित 9 फलंदाज दहाचा आकडाही पार करू शकले नाहीत. 66 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघाने 8 गडी राखून सामना जिंकला.
मंधानाने झटपट अर्धशतक केले टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती, पण 35 धावांवर आल्यावर दोन गडी गमावले. शेफाली वर्मा 5 आणि जेमिमा रॉड्रिग्सने 2 धावा करून बाद झाली. पण स्मृती मंधानाने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या साथीने डाव सांभाळला आणि सामना जिंकून परतली. मंधानाने 25 चेंडूत 51 धावांची नाबाद खेळी खेळली. तर हरमनने 14 चेंडूत 11 धावा केल्या. तिच्या खेळीमुळे भारतीय संघाने 8.3 षटकात 2 गडी गमावून 71 धावा करून सामना जिंकला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT