IPL 2021 चं भवितव्य काय? रेडीओ सिटीच्या प्रश्नांना ‘मुंबई तक’ची उत्तरं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बायो सिक्युअर बबलमध्ये असूनही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल २०२१ चा हंगाम स्थगित केला आहे. सध्याच्या परिस्थितीत खेळाडूंचं आरोग्य हे महत्वाचं असल्याचं सांगत बीसीसीआयने ही स्पर्धा स्थगित केली आहे. २९ सामने झाल्यानंतर संपूर्ण सिझन मध्येच स्थगित करावा लागल्यामुळे या हंगामाचं आता काय होणार? ही स्पर्धा पुढे होणार की नाही, BCCI यावर काही उपाय शोधेल का असे अनेक प्रश्न क्रिकेट प्रेमींच्या मनात आहेत. या प्रश्नांची उत्तर रेडीओसिटीचा आरजे केदारने मुंबई तकचे प्रतिनिधी प्रथमेश यांच्याशी गप्पा मारुन जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

ADVERTISEMENT

BCCI आयोजनात कुठे कमी पडलं का, बायो सिक्युअर बबल सारखी कडक व्यवस्था असतानाही आयपीएलमध्ये कोरोनाने शिरकाव कसा केला अशा अनेक प्रश्नांची उत्तर या चर्चेतून शोधण्याचा प्रयत्न झाला. परंतू येत्या काळात बीसीसीआयला आयपीएलचा उर्वरित हंगाम पूर्ण करण्यासाठी बराच प्रयत्न करावा लागणार आहे. यासाठी त्यांच्यासमोर सध्या ३ पर्याय उपलब्ध आहेत. कोणते आहेत हे ३ पर्याय जाणून घेऊयात…

पहिला पर्याय – १० दिवसांचा ब्रेक घेऊन आयपीएलचे उर्वरित सामने मुंबईत हलवता येतील

हे वाचलं का?

कोलकाता आणि चेन्नईच्या गोटात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बीसीसीआय या पर्यायाची चाचपणी करत होतं. ३ स्टेडीयम (वानखेडे, ब्रेबॉन, डी.वाय.पाटील) असल्यामुळे बीसीसीआय संपूर्ण स्पर्धा मुंबईत हलवण्याचा विचार करत असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. बीसीसीआयने सध्या स्पर्धा स्थगित केली असली तरीही बीसीसीआय या पर्यायाचा अजुनही विचार करु शकतं. परंतू सध्याची परिस्थिती पाहता सर्व खेळाडूंना १० दिवसांचा ब्रेक मिळणं गरजेचं आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये लॉकडाउनमुळे रुग्णंसख्या आटोक्यात आली आहे. शहरात कोरोनाचा धोका टळला नसला तरीही इतर शहरांच्या तुलनेत मुंबईतलं वातावरण बीसीसीआयसाठी योग्य आहे. अशा परिस्थितीत १० दिवसांच्या ब्रेकमध्ये बीसीसीआय मुंबईत बायो सिक्युअर बबल तयार करुन योग्य ती खबरदारी घेत सर्व सामने मुंबईत हलवू शकतं.

दुसरा पर्याय – WTC फायनल पुढे ढकलून आयपीएल जून महिन्यात युएईमध्ये भरवता येईल

ADVERTISEMENT

यंदाच्या वर्षात आयपीएलचा उर्वरित हंगाम संपवायचा असेल तर बीसीसीआयसमोर हा आणखी एक पर्याय उपलब्ध आहे. परंतू यासाठी बीसीसीआयला आयसीसीच्या दरबारात आपलं वजन वापरण्याची वेळ येऊ शकते. जून महिन्यात आयपीएल स्पर्धा युएईत खेळवण्याचा विचार झाल्यास १८ जूनपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील World Test Championship च्या फायनल मॅचवर याचा फरक पडू शकतो. त्यामुळे बीसीसीआयला आयसीसी सोबतच न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचीही मनधरणी करावी लागू शकते. परंतू बीसीसीआयने या पर्यायाचा विचार केला तरीही प्रॉब्लेम संपत नाहीयेत.

ADVERTISEMENT

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने १ जून ते २० जून या कालावधीत पाकिस्तान सुपरलिग स्पर्धेचे उर्वरित सामने खेळवण्याची तयारी केली आहे. पाकिस्तान सुपर लिगचे सामनेही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करावे लागले होते. पण असं असलं तरीही आयपीएल जून महिन्यात खेळवता येऊ शकते. कारण फार कमी परदेशी खेळाडू हे आयपीएल आणि पीएसएल अशा दोन्ही स्पर्धांमध्ये खेळतात. त्यामुळे बीसीसीआयने जून महिन्यात आयपीएल खेळवायचं ठरवल्यास ते परदेशी खेळाडूंना कोणती स्पर्धा खेळायची आहे हे निवडण्याचा अधिकार देऊ शकतात. पण यासाठीही बीसीसीआयला पाक क्रिकेट बोर्डाशी चर्चा करावीच लागणार आहे.

तिसरा पर्याय – टी-२० वर्ल्डकपआधी ऑक्टोबर महिन्यात युएईत आयपीएलचं आयोजन करता येईल

यंदाच्या वर्षात भारताचा इंग्लंड दौरा हा १४ सप्टेंबरला संपतो आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-२० विश्वचषकाचं आयोजन आहे. ही स्पर्धा भारतामध्येच खेळवण्याबद्दल बीसीसीआयने तयारी केली असली तरीही कोरोनामुळे परिस्थिती बिघडत गेल्यास युएईत ही स्पर्धा खेळवण्याचा पर्याय बीसीसीआयने खुला ठेवला आहे. अशा परिस्थितीत टी-२० वर्ल्डकप युएईला भरवला गेला तर बीसीसीआय आयपीएलचा उर्वरित हंगामही ऑक्टोबरमध्ये युएईत खेळवू शकते. यामुळे एका स्पर्धेच्या बायो बबलमधून बाहेर पडल्यानंतर खेळाडू दुसऱ्या महत्वाच्या स्पर्धेसाठीच्या बायो बबलमध्ये प्रवेश करु शकतात. परंतू या पर्यायातही बीसीसीआयने अनेकांच्या परवानग्या आणि मनधरणी करावी लागणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT