IPL 2021 साठी टीम ओनर्सची तयारी सुरु, UAE मध्ये हॉटेल बुकींगला सुरुवात
आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम युएईत खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी जाहीर केला. सप्टेंबर ते ऑक्टोबर या एक महिन्याच्या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाईल. दरम्यान संघमालक या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांसाठी तयार झाले असून त्यांनी युएईत खेळाडूंसाठी हॉटेलचं बुकींग व इतर सोयी-सुविधांची तयारी करायला सुरुवात केली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात संघमालक युएईत आपला […]
ADVERTISEMENT
आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम युएईत खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी जाहीर केला. सप्टेंबर ते ऑक्टोबर या एक महिन्याच्या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाईल. दरम्यान संघमालक या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांसाठी तयार झाले असून त्यांनी युएईत खेळाडूंसाठी हॉटेलचं बुकींग व इतर सोयी-सुविधांची तयारी करायला सुरुवात केली.
ADVERTISEMENT
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात संघमालक युएईत आपला बेस हलवणार आहेत. परंतू BCCI सोबत क्वारंटाइन व इतर नियमांसंदर्भात चर्चा झाल्यानंत याबद्दल अंतिम निर्णय घेतला जाईल. याव्यतिरीक्त आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे उर्वरित हंगामात परदेशी खेळाडूंचा सहभाग, अनेक देशांनी आगामी टी-२० वर्ल्डकपचं कारण देऊन खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाकारली आहे. परंतू संघमालकांना परदेशी खेळाडूंच्या सहभागाबद्दल खात्री आहे.
ANI शी बोलत असताना एका संघमालकाने परदेशी खेळाडूंच्या उपस्थितीबद्दल प्राथमिक चर्चेला सुरुवात झाली आहे. परंतू अद्याप परदेशी खेळाडू सहभागी होतील की नाही याबद्दल ठोस माहिती देता येणार नाही. BCCI आणि Emirates Cricket Board यांच्या क्वारंटाइन नियमांवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याचं सांगितलं. त्यामुळे BCCI आगामी काळात परदेशी खेळाडूंच्या सहभागाबद्दल काय निर्णय घेतंय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT