IPL 2021 : BCCI कडून सामन्यादरम्यान खेळाडूंसाठीही कठोर नियम
खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयने आयपीएलचा भारतामधला हंगाम स्थगित करत उर्वरित हंगाम युएईत आयोजित करायचं ठरवलं. १९ सप्टेंबरपासून युएईत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. यंदाचा टी-२० वर्ल्डकपही युएईत आयोजित केला जाणार असल्यामुळे बीसीसीआयला दोन्ही स्पर्धांच्या आयोजनासाठी सोपं पडणार आहे. परंतू भारतामध्ये आलेल्या अनुभवानंतर बीसीसीआय आता सावध झाली आहे. प्रत्येक संघासाठी बायो सिक्युअर बबल आणि आरोग्यविषयक […]
ADVERTISEMENT
खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयने आयपीएलचा भारतामधला हंगाम स्थगित करत उर्वरित हंगाम युएईत आयोजित करायचं ठरवलं. १९ सप्टेंबरपासून युएईत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. यंदाचा टी-२० वर्ल्डकपही युएईत आयोजित केला जाणार असल्यामुळे बीसीसीआयला दोन्ही स्पर्धांच्या आयोजनासाठी सोपं पडणार आहे. परंतू भारतामध्ये आलेल्या अनुभवानंतर बीसीसीआय आता सावध झाली आहे.
ADVERTISEMENT
प्रत्येक संघासाठी बायो सिक्युअर बबल आणि आरोग्यविषयक नियमांची एक Health Advisory तयार केल्यानंतर बीसीसीआयने सामन्यादरम्यान खेळाडूंसाठी कठोर नियम तयार केले आहेत. Inside Sports ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. ज्यात खेळाडूंना ड्रिंक्स ब्रेकदरम्यान एकमेकांच्या पाण्याच्या बॉटल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. जाणून घेऊयात काय असणार आहेत खेळाडूंसाठीचे कडक नियम….
IPL in UAE : Corona ला दूर ठेवण्यासाठी BCCI ची जय्यत तयारी, १४ बायो सिक्युअर बबल तयार करणार
हे वाचलं का?
१) सामन्याच्या दिवशी कोणताही खेळाडू आपली पाण्याची बाटली, खाण्याच्या वस्तू, एनर्जी ड्रिंक, टॉवेल इतर खेळाडूसोबत शेअर करणार नाही.
२) जो बदली खेळाडू ब्रेक दरम्यान ड्रिंक्स घेऊन येईल त्याला आपल्यासोबत एक ड्रिंक्स होल्डर सोबत ठेवावं लागेल. प्रत्येक खेळाडू आपल्याच बाटलीतून पाणी पिऊ शकेल.
ADVERTISEMENT
३) संघमालकांनी आणि व्यवस्थापनाने प्रत्येक खेळाडूंच्या बाटलीवर त्याचं नाव लिहीलेलं असेल याची काळजी घ्यावी
ADVERTISEMENT
४) आपले टॉवेल इतर खेळाडू वापरणार नाहीत याची प्रत्येक खेळाडूने काळजी घ्यावी असे आदेश संघमालकांना देण्यात आले आहेत.
एका क्लिकवर जाणून घ्या IPL 2021 च्या उर्वरित सिझनचं Time Table
याव्यतिरीक्त आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी बदल झालेला नियम म्हणजे Ball Change Rule. एखाद्यावेळी खेळाडूने मारलेला षटकार हा मैदानाबाहेर गेला तर तो बॉल न वापरता नवीन बॉल वापरण्यात येईल. जुना बॉल मिळाल्यानंतर तो सॅनिटाईज करुन नंतरच बॉल लायब्ररीमध्ये ठेवण्यात येईल. याआधी बॉल मैदानाबाहेर गेला तर अंपायर तो बॉल सॅनिटाईज करुन पुन्हा खेळ सुरु करत होते…परंतू बीसीसीयने यंदा या नियमांमध्ये बदल केलेला आहे. याचसोबत खेळाडूंना बॉल चमकवण्यासाठी थुंकी किंवा लाळ वापरता येणार नाहीये, या नियमात बीसीसीआयने कोणताही बदल केला नाहीये.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT