IPL 2021 : १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या उर्वरित हंगामात संघांना या ७ नियमांचं करावं लागणार पालन
आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या दुसऱ्या पर्वाची १९ सप्टेंबरपासून युएईत सुरुवात होते आहे. पहिला हंगाम कोरोनामुळे स्थगित करावा लागल्यानंतर बीसीसीआयने उर्वरित हंगाम युएईत आयोजित केला आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. युएईत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा कोविडमुळे बेरंग होऊ नये यासाठी बीसीसीआयने कसोशीने प्रयत्न केले आहेत. सर्व संघांसाठी नियम कडक […]
ADVERTISEMENT
आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या दुसऱ्या पर्वाची १९ सप्टेंबरपासून युएईत सुरुवात होते आहे. पहिला हंगाम कोरोनामुळे स्थगित करावा लागल्यानंतर बीसीसीआयने उर्वरित हंगाम युएईत आयोजित केला आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे.
ADVERTISEMENT
युएईत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा कोविडमुळे बेरंग होऊ नये यासाठी बीसीसीआयने कसोशीने प्रयत्न केले आहेत. सर्व संघांसाठी नियम कडक करण्यात आले असून बायो सिक्युअर बबल मोडलं जाणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. तसेच सर्व खेळाडू आणि इतरांच्या सुरक्षेसाठी काही नियम आखून देण्यात आले आहेत ज्याचं पालन सर्वांना करावं लागणार आहे.
IPL 2020 in UAE : आव्हान कायम राखण्यासाठी टॉप ४ मधील संघांना काय करावं लागेल?
हे वाचलं का?
१) खेळाडूंचा परिवार आणि संघमालकही बायो सिक्युअर बबलमध्ये राहणार
भारतात आयोजित स्पर्धेदरम्यान झालेल्या त्रुटींचा विचार करता बीसीसीआयने युएईत ही चूक सुधारण्याचं ठरवलं आहे. यंदा खेळाडू आणि त्यांच्या परिवारासह संघमालकांनाही बबलमध्ये रहावं लागणार आहे. अगदीचं गरजेचं कारण असेल तर या व्यक्ती बबल मोडून बाहेर जाऊ शकतात ज्यासाठी त्यांना बीसीसीआयच्या प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागणार आहे.
ADVERTISEMENT
एका क्लिकवर जाणून घ्या IPL 2021 च्या उर्वरित सिझनचं Time Table
ADVERTISEMENT
२) संघ राहत असलेली हॉटेलमधली जागा पूर्णपणे सील होणार
संघातील खेळाडू हॉटेलमधील ज्या भागात राहणार आहेत तो भाग पूर्णपणे सील केला जाणार आहे. हॉटेलमधे हे खेळाडू इतर व्यक्तींच्या संपर्कात येऊ नयेत यासाठी ही काळजी घेतली जाणार आहे.
३) बायो बबल मॅनेजर
कोणत्याही संघात खेळाडू किंवा इतर व्यक्तींकडून बायो सिक्युअर बबल मोडलं जाऊ नये हे तपासण्यासाठी Bubble Integrity Managers ची नेमणूक करण्यात आली आहे. जर एखाद्या खेळाडूकडून बायो सिक्युअर बबल मोडलं जात असेल तर त्याबद्दल संबंधित व्यक्तींना सांगण्याची जबाबदारी या मॅनेजर्सवर असणार आहे.
४) बॉल बदलले जाणार
सामन्यादरम्यान जर फलंदाजाने मारलेला षटकार मैदानाबाहेर गेला तर तो बॉल बदली करुन नवीन बॉलने सामना सुरु करण्यात येईल. बॉलद्वारे मैदानात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी हा नियम तयार करण्यात आला आहे. बाहेर गेलेला बॉल सॅनिटाईज करुन पुन्हा नवीन वापरासाठी तयार करण्यात येईल.
आनंदाची बातमी ! IPL 2021 च्या उर्वरित हंगामात प्रेक्षकांना मर्यादीत स्वरुपात परवानगी
५) खेळाडूंसाठी हॉटेलमध्ये चेक-इन काऊंटर्स
हॉटेलमध्ये खेळाडूंचा इतरांशी संपर्क होऊ नये यासाठी त्यांच्या मजल्यावर वेगळे चेक-इन काऊंटर्स बनवण्यात आले आहेत. हे खेळाडू बायो सिक्युअर बबलमध्ये राहतील आणि त्यांचा बाहेरील व्यक्तींशी संबंध येणार नाही यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे.
६) बायो सिक्युअर बबलमध्ये येण्याआधी ३ RTPCR टेस्ट अनिवार्य
जे खेळाडू बाहेरील वातावरणातून आत येत आहेत त्यांना बायो सिक्युअर बबलमध्ये प्रवेश करण्याआधी ७ दिवसांच्या कालावधीत ३ RTPCR चाचण्या करवून घेणं बंधनकारक करण्यात आलंय. तिन्ही चाचण्यांचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतरच सर्वांना बायो सिक्युअर बबलमध्ये प्रवेश मिळणार आहे.
७) बबल टू बबल ट्रान्स्फर
भारत विरुद्ध इंग्लंड मालिका खेळून आलेल्या भारतीय खेळाडूंना व इतर टी-२० लिगमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचंही बबल टू बबल ट्रान्स्फर करण्यात आलेलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT