IPL 2021 : MI vs RCB Head to Head, जाणून घ्या आकडेवारी काय सांगते?
IPL च्या तेराव्या हंगामाला आजपासून चेन्नईत सुरुवात होते आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. मागच्या दोन सिझनचं विजेतेपद पटकावणारी मुंबई इंडियन्स यंदाच्या सिझनमध्ये हॅटट्रीक करण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली RCB चा संघ यंदा आपल्या कामगिरीत सुधारणा करुन विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत जेव्हा […]
ADVERTISEMENT
IPL च्या तेराव्या हंगामाला आजपासून चेन्नईत सुरुवात होते आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. मागच्या दोन सिझनचं विजेतेपद पटकावणारी मुंबई इंडियन्स यंदाच्या सिझनमध्ये हॅटट्रीक करण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली RCB चा संघ यंदा आपल्या कामगिरीत सुधारणा करुन विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत जेव्हा कधीही मुंबई आणि बंगळुरु हे दोन संघ समोरासमोर आले आहेत, त्यावेळी काय घडलंय याची आकडेवारी आपण जाणून घेऊयात…
ADVERTISEMENT
यंदाच्या हंगामात कोणत्याही टीमला आपल्या घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळणार नाहीये. २०१९ मध्ये आयपीएलची पहिली मॅच चेन्नईत चेपॉकच्या ग्राऊंडवर खेळवण्यात आली होती. ही मॅच चेन्नई विरुद्ध बंगळुरु या दोन टीम्समध्ये खेळवण्यात आली. या मॅचमध्ये विराट कोहलीची RCB टीम फक्त ७० रन्सपर्यंत मजल मारु शकली होती. CSK ने हा सामना ७ विकेटने जिंकला होता, RCB कडून चहलने ४ ओव्हरमध्ये १ ओव्हर मेडन टाकून ६ रन देत १ विकेट घेतली होती. त्यामुळे आजच्या मॅचमध्येही स्पिनर्स आपलं वर्चस्व गाजवू शकतात.
MI आणि RCB या दोन्ही संघांचा विचार केला असला आतापर्यंत आयपीएलमध्ये जेव्हा कधीही हे दोन संघ समोरासमोर आले आहेत त्यावेळी मुंबई इंडियन्सचं पारडं जड राहिलेलं आहे. आतापर्यंत १९ मॅच मुंबई इंडियन्सने जिंकल्या असून १० मॅच RCB ने जिंकल्या आहेत. आयपीएल २०२० मध्ये झालेल्या दोन मॅचपैकी दोन्ही संघांनी १-१ मॅच जिंकली आहे. त्यामुळे आजच्या पहिल्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
हे वाचलं का?
या ६ स्टेडिअमवर रंगणार IPL 2021 चे सामने, जाणून घ्या प्रत्येक टीमचं Time Table
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT