दर दोन दिवसांनी टेस्टिंग, बाहेरील जेवणाला परवानगी नाही; BCCI कडून Bio Secure Bubble चे नियम अधिक कडक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. अशा परिस्थितीत आयपीएलचे सामने खेळवले जावेत की नाही यावरुन एक नवीन वाद सुरु झाला आहे. काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे हा मुद्दा चांगलाच चर्चेत होता. अशा परिस्थितीत बीसीसीआयने सर्व संघातील खेळाडूंसाठी Bio Secure Bubble चे नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

कमिन्सपाठोपाठ ब्रेट ली ची भारताला मदत, कोरोनाविरुद्ध लढाईसाठी दिलं आर्थिक पाठबळ

बायो सिक्युअर बबलमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आता दर दोन दिवसांनी कोरोना चाचणी केली जाणार आहे. आतापर्यंत ही चाचणी पाच दिवसांनी केली जात होती. बायो सिक्युअर बबलमध्ये असणारे खेळाडू बाहेरील व्यक्तींशी संपर्कात येत नाहीयेत, परंतू भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने नियम अधिक कठोर करण्याचं ठरवलं आहे.

हे वाचलं का?

याचसोबत बीसीसीआयने बायो सिक्युअर बबलमध्ये असलेल्या खेळाडूंना हॉटेल बाहेरील जेवण मागवण्यासाठीही मनाई केली आहे. याआधी खेळाडूंना हॉटेलबाहेरुन जेवणं मागवण्याची परवानगी देण्यात आली होती. दररोज हॉटेलमधलं तेच-तेच जेवण जेऊन कंटाळा येऊ नये यासाठी बीसीसीआयने खेळाडूंना आधी परवानगी दिली होती, परंतू सध्याची परिस्थिती पाहता बीसीसीआयने हा निर्णयही मागे घेतला आहे.

IPL 2021 : आमच्यासाठी Charter Plane ची सोय करा – ख्रिस लिनचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाला साकडं

ADVERTISEMENT

सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही खेळाडूंना हॉटेलबाहेरुन जेवण मागवण्याची परवानगी दिली होती, पण ही सुविधा आता बंद करण्यात आली आहे. याव्यतिरीक्त टेस्टिंगचं प्रमाण वाढवून बबल चे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत अशी माहिती बीसीसीआयचे सीईओ हेमांग अमिन यांनी सर्व संघमालकांना दिली आहे. आतापर्यंत भारतातील कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचं कारण देऊन ५ खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. ज्यात जोश हेडलवूड, केन रिचर्डसन, अॅडम झॅम्पा, अँड्रू टाय आणि रविचंद्रन आश्विन यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.

ADVERTISEMENT

लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीयेत आणि Team Owners एवढा पैसा खर्च करतायत? – अँड्रू टायची टीका

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT