IPL 2021 : डी-कॉकच्या दणक्यामुळे राजस्थान रॉयल्स घायाळ, मुंबई इंडियन्सचं दणक्यात पुनरागमन
चेन्नईवरुन दिल्लीत दाखल झालेल्या रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने दणक्यात पुनरागमन केलं आहे. गुरुवारी दिल्लीत खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर ७ विकेटने मात केली आहे. विकेटकिपर आणि ओपनिंग बॅट्समन क्विंटन डी-कॉकला या सामन्यात गवसलेला सूर ही सर्वात महत्वाची गोष्ट मानली जात आहे. डी-कॉकने नाबाद ७० धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. […]
ADVERTISEMENT
चेन्नईवरुन दिल्लीत दाखल झालेल्या रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने दणक्यात पुनरागमन केलं आहे. गुरुवारी दिल्लीत खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर ७ विकेटने मात केली आहे. विकेटकिपर आणि ओपनिंग बॅट्समन क्विंटन डी-कॉकला या सामन्यात गवसलेला सूर ही सर्वात महत्वाची गोष्ट मानली जात आहे. डी-कॉकने नाबाद ७० धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
ADVERTISEMENT
टॉस जिंकून मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानकडून जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांनी पॉवरप्लेच्या ओव्हर्समध्ये चांगली सुरुवात करत मुंबईला बॅकफूटला ढकललं. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ६६ रन्सची पार्टनरशीप केल्यानंतर राहुल चहरने बटलरला आऊट करत राजस्थानची जोडी फोडली. यानंतर कॅप्टन संजू सॅमसनने राजस्थानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सनी अखेरच्या टप्प्यात टिच्चून मारा करत राजस्थानच्या धावगतीवर अंकुश ठेवला. १७१ रन्सवर राजस्थानला रोखण्यात मुंबईला यश आलं.
IPL 2021 : प्लेअर्स पाठोपाठ दोन अंपायर्सचीही स्पर्धेतून माघार
हे वाचलं का?
प्रत्युत्तरादाखल मुंबई इंडियन्सनेही आश्वासक सुरुवात केली. गेल्या काही सामन्यांपासून खराब फॉर्ममुळे चर्चेत असलेल्या डी-कॉकने यंदा बहारदार सुरुवात केली. त्याने पहिल्या ओव्हरपासून राजस्थानच्या बॉलर्सवर दबाव टाकला. दुसऱ्या बाजूने रोहित शर्मा डी-कॉकला उत्तम साथ देत होता. परंतू ख्रिस मॉरिसने रोहितला आऊट करत मुंबईची जोडी फोडली. यानंतर मैदानावर आलेला सूर्यकुमार यादवही फारशी चमक दाखवू शकला नाही.
दर दोन दिवसांनी टेस्टिंग, बाहेरील जेवणाला परवानगी नाही; BCCI कडून Bio Secure Bubble चे नियम अधिक कडक
ADVERTISEMENT
परंतू डी-कॉकने एका बाजूने फटकेबाजी सुरु ठेवत राजस्थानच्या संघावर दडपण कायम राखलं. तिसऱ्या विकेटसाठी डी-कॉकने कृणाल पांड्यासोबत महत्वपूर्ण भागीदारी करत राजस्थानला पूरतं बॅकफूटला ढकललं. कृणाल आऊट झाल्यानंतर डी-कॉकने पोलार्डच्या साथीने मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ५० बॉलमध्ये ५ फोर आणि २ सिक्स लगावत डी-कॉकने नाबाद ७० धावा केल्या.
ADVERTISEMENT
IPL 2021 : कोरोनाविरुद्ध लढ्यात राजस्थान रॉयल्सचं मोठं योगदान, ७.५ कोटींची आर्थिक मदत
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT