IPL 2021: ओपनिंग मॅचमधल्या अपयशाची परंपरा संपवेल का मुंबई इंडियन्स?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे एकीकडे देशभरात लॉकडाउनसदृष्य परिस्थिती निर्माण झालेली असली तरीही आजपासून क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयपीएलच्या चौदाव्या सिझनला आज सुरुवात होत असून, MI vs RCB यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. परंतू गेल्या ८ वर्षांपासून ओपनिंग मॅचमध्ये पराभवाचा सामना करणाऱ्या मुंबई इंडियन्सला पहिल्या मॅचमध्ये यश मिळेल का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

ADVERTISEMENT

या ६ स्टेडिअमवर रंगणार IPL 2021 चे सामने, जाणून घ्या प्रत्येक टीमचं Time Table

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ हा आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. २०१९ आणि २०२० अशा सलग दोन वर्षांचं विजेतेपद मुंबईने पटकावलं. यंदा मुंबईला विजेतेपदाची हॅटट्रीक करण्याची चांगली संधी आहे. परंतू गेल्या ८ वर्षांमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ एकदाही आपली ओपनिंगची मॅच जिंकू शकलेला नाही. २०१३ साली रिकी पाँटींगच्या नेतृत्वाखाली मुंबईने सलामीचा सामना जिंकला होता. यानंतर मुंबईला सलामीच्या सामन्यात आतापर्यंत एकदाही विजय मिळवता आलेला नाही.

हे वाचलं का?

IPL 2021 : RCB चा जीव भांड्यात, देवदत पडीकलची कोरोनावर मात

युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या तेराव्या सिझनमध्येही मुंबईची खराब सुरुवात झाली होती. परंतू यानंतर रोहित शर्माच्या टीमने टॉप गिअरमध्ये गाडी चालवत थेट विजेतेपदावर मोहर उमटवली. यंदाही रोहितसमोर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आव्हान असणार आहे. सध्या देशात कोरोनाची परिस्थिती पाहता बीसीसीआयने सर्व सामने हे प्रेक्षकांविना खेळवण्याचं ठरवलं आहे. २०१९ नंतर पहिल्यांदाच आयपीएल भारतात खेळवलं जातंय. त्यामुळे या सामन्यात मुंबईचा संघ आपली ८ वर्षांपासूनची पराभवाची परंपरा मोडतं का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT