IPL 2021 : टी-२० क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणे शेवटचा पर्याय म्हणूनच योग्य – संजय मांजरेकर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलच्या चौदाव्या सिझनमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज हे दोन संघ समोरासमोर येणार आहेत. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत दिल्लीचं नेतृत्व करणार आहे. अशा स्थितीत दिल्लीला आपला अंतिम ११ जणांचा संघ निवडताना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे. माजी क्रिकेटपटू संजय मांजरकेर यांच्या मते दिल्लीच्या संघात अजिंक्य रहाणे हा शेवटचा पर्याय म्हणूनच योग्य आहे.

ADVERTISEMENT

“टी-२० क्रिकेटमध्ये मी अजिंक्य रहाणेला फारसा पाठींबा देणार नाही कारण मी त्याचा गेल्या काही वर्षांमधला खेळ पाहतो आहे. त्याच्यातली नैसर्गिक शैली ही कसोटी क्रिकेटसाठी योग्य आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सिक्स आणि फोर मारण्यासाठी एखाद्या बॅट्समनकडे प्रचंड आत्मविश्वास असावा लागतो. गेल्या ३-४ वर्षांमध्ये अजिंक्य रहाणेमध्ये मला तो आत्मविश्वास दिसत नाही. त्यामुळे दिल्लीच्या बॅटींगचा विचार करायचा असेल तर मार्कस स्टॉयनिसला संधी देऊन मी दुसऱ्या पर्यायांचा विचार करेन. अजिंक्य रहाणे हा माझ्यासाठी नेहमी शेवटचा पर्याय म्हणूनच योग्य असेल.” संजय मांजरेकर ESPNCricinfo च्या कार्यक्रमात बोलत होते.

अजिंक्य रहाणे याआधी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्व करायचा. आयपीएल २०२० साठी राजस्थानने अजिंक्यला दिल्लीच्या संघात दिलं. आयपीएल २०२० मध्येही अजिंक्यला संपूर्ण सामन्यांमध्ये संधी मिळाली नाही. परंतू ज्या सामन्यांमध्ये अजिंक्यला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्यातही तो अपयशी ठरला. त्यामुळे नवीन हंगामात अजिंक्य रहाणेला दिल्ली कॅपिटल्सच्या संघात संधी मिळते की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

IPL 2021 Explainer : ऋषभकडे दिल्ली कॅपिटल्सची कॅप्टन्सी, निर्णय किती बरोबर किती चूक?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT