IPL 2021 : पहिल्याच परीक्षेत पंत पास, धोनीच्या CSK चा दिल्लीकडून धुव्वा
श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करणाऱ्या ऋषभ पंतची सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्याच सामन्यात ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सने महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जचा ७ विकेट्सने धुव्वा उडवला आहे. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या १३८ रन्सच्या पार्टनरशीपच्या जोरावर दिल्लीने चेन्नईचं १८९ रन्सचं टार्गेट सहज पूर्ण केलं. पंतने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय […]
ADVERTISEMENT
श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करणाऱ्या ऋषभ पंतची सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्याच सामन्यात ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सने महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जचा ७ विकेट्सने धुव्वा उडवला आहे. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या १३८ रन्सच्या पार्टनरशीपच्या जोरावर दिल्लीने चेन्नईचं १८९ रन्सचं टार्गेट सहज पूर्ण केलं.
ADVERTISEMENT
पंतने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. आवेश खान आणि ख्रिस वोक्स यांनी पहिल्याच स्पेलमध्ये चेन्नईला धक्के दिले आणि ऋतुराज गायकवाड व फाफ डु-प्लेसिस यांना माघारी धाडलं. यानंतर मोईन अली आणि कमबॅक करणाऱ्या सुरेश रैनाने चेन्नईची बाजू सांभाळली. २०२० च्या सिझनमध्ये एकही मॅच न खेळता भारतात परत आलेल्या रैनाने चौदाव्या सिझनच्या पहिल्याच सामन्यात हाफ सेंच्युरी झळकावली. मोईन अलीसोबत महत्वाची पार्टनरशीप करताना रैनाने ३६ बॉलमध्ये ३ फोर आणि ४ सिक्स लगावत ५४ रन्स केल्या. ही जोडी फुटल्यानंतर मधल्या फळीत अंबाती रायुडू, रविंद्र जाडेजा आणि अखेरच्या फळीत सॅम करनने फटकेबाजी करत चेन्नईला १८८ रन्सचा टप्पा गाठून दिला. महत्वाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीला या सामन्यात एकही रन करता आली नाही. आवेश खानने त्याला क्लिन बोल्ड केलं. दिल्लीकडून ख्रिस वोक्स आणि आवेश खान यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या, तर आश्विन आणि टॉम करन यांनी १-१ विकेट घेतली.
प्रत्युत्तरादाखल दिल्ली कॅपिटल्सची सुरुवातच धडाकेबाज झाली. गेल्या हंगामात पूर्णपणे अपयशी ठरलेला पृथ्वी शॉने आपल्या खेळीने सर्व टीकाकारांची तोंड बंद केली. चेन्नईच्या सर्व बॉलर्सवर दिल्लीच्या दोन्ही बॅट्समननी चौफेर हल्ला चढवला. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केल्यानंतर दिल्ली हा सामना एकही विकेट न गमावता जिकंणार असं वाटत होतं. परंतू अखेरीस ब्राव्होने पृथ्वी शॉला आऊट केलं आणि चेन्नईला पहिलं यश मिळवून दिलं. पृथ्वीने ३८ बॉल्समध्ये तुफान फटकेबाजी करत ९ फोर आणि ३ सिक्स लगावत ७२ रन्सची इनिंग खेळली.
हे वाचलं का?
यानंतर शिखर धवनला आपलं शतक पूर्ण करण्याची चांगली संधी होती. परंतू शार्दुल ठाकूरने त्याला आऊट करत दिल्लीला आणखी एक धक्का दिला. शार्दुल ठाकूरने १९ व्या ओव्हरमध्ये स्टॉयनिसला आऊट करत दिल्लीला आणखी एक धक्का देण्याचा प्रयत्न केला, परंतू तोपर्यंत पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. यानंतर कॅप्टन ऋषभ पंतने शेमरॉन हेटमायरच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने २ विकेट्स घेतल्या, तर ब्राव्होने १ विकेट घेतली. परंतू चेन्नईच्या फिल्डर्सनी काही सोपे कॅच सोडत दिल्लीला मदतच केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT