IPL 2021 : राजस्थानला गवसला विजयी सूर, KKR वर ६ विकेट राखून मात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात अखेरीस राजस्थान रॉ़यल्सला विजयी सूर गवसला आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सने KKR वर ६ विकेट राखून मात केली आहे.कोलकात्याने विजयासाठी दिलेलं १३४ रन्सचं टार्गेट राजस्थानने कॅप्टन संजू सॅमसनच्या संयमी खेळीच्या जोरावर पूर्ण केलं.

ADVERTISEMENT

IPL 2021 Explainer : गतविजेत्या मुंबईची खराब सुरुवात, संघात हे ३ बदल करणं गरजेचं

टॉस जिंकून राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनने पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या बॉलर्सनी आजच्या सामन्यात चांगलं कमबॅक केलं. गेल्या काही सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलेल्या राजस्थानने KKR च्या बॅट्समनवर सुरुवातीपासूनच अंकुश लावला. नितीश राणा आणि शुबमन गिल या सलामीच्या जोडीला लवकर माघारी धाडल्यानंतर KKR च्या इतर बॅट्समननी पुरती निराशा केली. राहुल त्रिपाठी आणि दिनेश कार्तिकचा अपवाद वगळता कोलकात्याचा सर्व बॅट्समन आज अपयशी ठरले. राजस्थान रॉयल्सकडून ख्रिस मॉरिसने ४ तर जयदेव उनाडकट-चेतन सकारिया आणि मुस्तफिजूर रेहमान यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

हे वाचलं का?

प्रत्युत्तरादाखल राजस्थान ऱॉयल्सची सुरुवातही खराब झाली. जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांना झटपट माघारी धाडण्यात कोलकाता नाइट रायडर्सचे बॉलर यशस्वी झाले. परंतू यानंतर कॅप्टन संजू सॅमसनने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली. संजू सॅमसनने सर्वात आधी शिवम दुबे आणि त्यानंतर डेव्हिड मिलरसोबत महत्वाची भागीदारी करत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दरम्यान राजस्थानने आपल्या पराभवाची मालिका खंडीत केली असली तरीही कोलकाता नाइट रायडर्सच्या खराब कामगिरीची सिलसिला कायम सुरुच राहिला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT