IPL 2021 चा मुहूर्त ठरला, १९ सप्टेंबरपासून सुरु होणार उर्वरित सिझन
IPL च्या उर्वरित सिझनसाठी बीसीसीआयने अखेरीस तारीख निश्चीत केली आहे. १४ व्या हंगामातले उर्वरित सामने हे युएईत खेळवले जाणार असून १९ सप्टेंबरपासून या उर्वरित हंगामाला सुरुवात होणार आहे. तसेच १५ ऑक्टोबरला आयपीएल २०२१ चा अंतिम सामना खेळवला जाईल. IPL 14: Season to resume on September 19, final on October 15 Read @ANI Story | https://t.co/LOQbJ5CR2r […]
ADVERTISEMENT
IPL च्या उर्वरित सिझनसाठी बीसीसीआयने अखेरीस तारीख निश्चीत केली आहे. १४ व्या हंगामातले उर्वरित सामने हे युएईत खेळवले जाणार असून १९ सप्टेंबरपासून या उर्वरित हंगामाला सुरुवात होणार आहे. तसेच १५ ऑक्टोबरला आयपीएल २०२१ चा अंतिम सामना खेळवला जाईल.
ADVERTISEMENT
IPL 14: Season to resume on September 19, final on October 15
Read @ANI Story | https://t.co/LOQbJ5CR2r pic.twitter.com/VsYwwRm56w
— ANI Digital (@ani_digital) June 7, 2021
बीसीसीआयचे काही अधिकारी स्पर्धेच्या आयोजनासाठी युएईला गेले होते. इथे Emirates Cricket Board च्या अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून शारजाह, दुबई आणि अबुधाबी या तीन मैदानांवर या स्पर्धेचे उर्वरित सामने खेळवले जातील अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी ANI शी बोलताना दिली.
“आमची चर्चा खूप चांगली झाली, बीसीसीआयच्या बैठकीदरम्यानच Emirates Cricket Board ने उर्वरित हंगाम युएईत खेळवण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे आता यावर फक्त औपचारिक चर्चा करणं बाकी होतं. उर्वरित हंगामाचा पहिला सामना हा १९ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल तर अंतिम सामना १५ ऑक्टोबरला खेळवला जाईल.” BCCI २५ दिवसांमध्ये उर्वरित सामने संपवण्याच्या तयारीत आहे.
हे वाचलं का?
T-20 वर्ल्डकपचं आयोजन युएईत? BCCI स्पर्धा भारतात आयोजित करण्याचे प्रयत्न थांबवणार
उर्वरित हंगामात परदेशी खेळाडूंच्या सहभागाबद्दल प्रश्न विचारला असता, आमची सर्व क्रिकेट बोर्डाशी चर्चा सुरु असून याबद्दल आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. जर काही खेळाडूंनी खेळण्यासाठी नकार दिला तर काय करायचं याबद्दलही आमचा प्लान तयार आहे अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT