IPL 2021 : Bio Secure Bubble मध्ये आम्ही सुखरुप आहोत : क्विंटन डी-कॉक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ आणि प्रत्येक दिवशी आरोग्य व्यवस्थेवर येणाऱ्या ताणामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीतही आयपीएलचे सामने सुरु असल्यावरुन बरीच चर्चाही सुरु आहे. काही खेळाडूंनी भारतामधील या परिस्थितीचा धसका घेऊन स्पर्धेतून माघारही घेतली. परंतू मुंबई इंडियन्सचा विकेटकिपर बॅट्समन क्विंटन डी-कॉकने बायो सिक्युअर बबलमध्ये आम्ही सुखरुप असल्याचं सांगत BCCI च्या आयोजनावर विश्वास ठेवला आहे.

ADVERTISEMENT

IPL 2021 : डी-कॉकच्या दणक्यामुळे राजस्थान रॉयल्स घायाळ, मुंबई इंडियन्सचं दणक्यात पुनरागमन

“खरं सांगायला गेलं तर आमचा डॉक्टरांवर विश्वास आहे त्यामुळे बायो सिक्युअर बबलमध्ये आम्हाला सुखरुप वाटत आहे. आम्हाला इथे फारसा काही त्रास जाणवत नाहीये. आम्ही सर्व प्रकारे काळजी घेतोय आणि मला इथे कसलाही त्रास जाणवला नाही. बाकीच्या खेळाडूंबद्दल मी बोलू शकणार नाही. मी माझ्यापुरतं सांगेन की मला इथे कसलाच त्रास जाणवत नाहीये. दररोजचा सराव आणि मॅच समोर असताना इतर गोष्टींचा विचार कधी मनात येत नाही.” क्विंटन डी-कॉक राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होता.

हे वाचलं का?

IPL 2021 : प्लेअर्स पाठोपाठ दोन अंपायर्सचीही स्पर्धेतून माघार

आतापर्यंत जोश हेजलवूड (चेन्नई सुपरकिंग्ज), अँड्रू टाय (राजस्थान रॉयल्स), अॅडम झॅम्पा आणि केन रिचर्डसन (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु), रविचंद्रन आश्विन (दिल्ली कॅपिटल्स) या खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. याव्यतिरीक्त अंपायर नितीन मेनन आणि पॉल राफेल यांनीही स्पर्धा मध्यावरच सोडली आहे. भारतात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन राजस्थान रॉयल्सच्या अँड्रू टायने काही दिवसांपूर्वी चिंता व्यक्त करत देशात लोकांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नसताना आयपीएलमध्ये टीम ओनर्स एवढा पैसा कसा खर्च करत आहेत असा प्रश्न विचारला होता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT