IPL 2022 : KKR ची गाडी रुळावर, पंजाब किंग्जवर ६ विकेटने मात
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात KKR ला पुन्हा एकदा विजयी सूर गवसला आहे. सलामीच्या सामन्यात चेन्नईला पराभवाचा धक्का दिल्यानंतर RCB विरुद्ध सामन्यात कोलकात्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर शुक्रवारी वानखेडे मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात कोलकात्याने पंजाबवर ६ विकेटने मात करत विजय संपादन केला आहे. विजयासाठी मिळालेलं १३८ धावांचं आव्हान कोलकात्याने रसेल आणि बिलींग्जच्या फटकेबाजीच्या जोरावर पूर्ण […]
ADVERTISEMENT
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात KKR ला पुन्हा एकदा विजयी सूर गवसला आहे. सलामीच्या सामन्यात चेन्नईला पराभवाचा धक्का दिल्यानंतर RCB विरुद्ध सामन्यात कोलकात्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर शुक्रवारी वानखेडे मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात कोलकात्याने पंजाबवर ६ विकेटने मात करत विजय संपादन केला आहे. विजयासाठी मिळालेलं १३८ धावांचं आव्हान कोलकात्याने रसेल आणि बिलींग्जच्या फटकेबाजीच्या जोरावर पूर्ण केलं.
ADVERTISEMENT
पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या पंजाबची सुरुवात अडखळती झाली. मयांक अग्रवाल उमेश यादवच्या बॉलिंगवर स्वस्तात माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि भनुका राजपक्षे यांनी दुसऱ्या विकेटसाठी फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला. शिवम मवीने राजपक्षेला आऊट करत पंजाबला दुसरा धक्का दिला. यानंतर दुर्दैवाने पंजाबचे खेळाडू महत्वाच्या ओव्हर्समध्ये भागीदारी करुच शकले नाहीत.
IPL 2022 : मुंबई इंडियन्सला दहा हत्तींचं बळ, सूर्यकुमार यादव संघात दाखल
हे वाचलं का?
ठराविक अंतराने पंजाबचे खेळाडू बाद होत राहिल्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्याचं त्यांचं स्वप्न अधुरचं राहिलं. अखेरच्या फळीत कगिसो रबाडाने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने १३७ हा आव्हानात्मक धावसंख्येचा टप्पा गाठला. कोलकात्याकडून उमेश यादवने ४ ओव्हरमध्ये २३ रन्स देत ४ विकेट घेतल्या. त्याला टीम साऊदीने २ तर मवी, नारायण आणि रसेल या त्रिकुटाने १-१ विकेट घेत चांगली साथ दिली.
Kaun Pravin Tambe?: ‘मुलं मोठी होईपर्यंत माझा संघर्ष सुरु होता,आज त्यांच्या डोळ्यात पाणी आलं’
ADVERTISEMENT
प्रत्युत्तरादाखल कोलकाता नाईट रायडर्सने आश्वासक सुरुवात केली. परंतू कगिसो रबाडाने अजिंक्य रहाणेला आऊट करत कोलकात्याला धक्का दिला. यानंतर श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यरने छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. श्रेयस अय्यरने काही चांगले फटकेही खेळले. ओडेन स्मिथने अय्यरला आऊट करत कोलकात्याला दुसरा धक्का दिला. यानंतर नितीश राणा आणि श्रेयस अय्यरची जोडी जमली.
ADVERTISEMENT
राहूल चहरने या दोन्ही फलंदाजांना लागोपाठ माघारी धाडत सामन्यात रंगत निर्माण केली. परंतू यानंतर मैदानात आलेल्या आंद्रे रसेल आणि सॅम बिलींग्ज यांनी मैदानात चौफेर फटकेबाजी करत सामन्याचं चित्रच पालटवून टाकलं. विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा पूर्ण करत रसेल-बिलींग्ज जोडीने कोलकात्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. रसेलने ३१ बॉलमध्ये २ चौकार आणि ८ षटकार लगावत नाबाद ७० धावांची खेळी केली. त्याला बिलींग्जने नाबाद २४ धावा करत चांगली साथ दिली.
आधी हार्दिक पांड्याला घाम फोडला नंतर चेन्नईचा विजय हिसकावला, जाणून घ्या आयुष बदोनीबद्दल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT