IPL 2022 : तब्बल ३ कोटी खर्च करुन मुंबईने खरेदी केला ‘Baby AB’ आहे तरी कोण? जाणून घ्या…
IPL च्या पंधराव्या हंगामासाठी झालेल्या हंगामात आज मुंबई इंडियन्सने सावध पवित्रा घेतलेला पहायला मिळाला. एकीकडे सर्व संघ खेळाडूंना खरेदी करण्यासाठी धावपळ करत असताना मुंबई इंडियन्सच्या गोटात शांतता दिसत होती. परंतू पहिल्या दिवशीच्या लिलावात मुंबईने ३ कोटी रुपये खर्च करुन संघात घेतलेल्या एका १९ वर्षीय खेळाडूची सध्या चर्चा होते आहे. मुंबई इंडियन्सने दक्षिण आफ्रिकेचा १९ वर्षीय […]
ADVERTISEMENT
IPL च्या पंधराव्या हंगामासाठी झालेल्या हंगामात आज मुंबई इंडियन्सने सावध पवित्रा घेतलेला पहायला मिळाला. एकीकडे सर्व संघ खेळाडूंना खरेदी करण्यासाठी धावपळ करत असताना मुंबई इंडियन्सच्या गोटात शांतता दिसत होती. परंतू पहिल्या दिवशीच्या लिलावात मुंबईने ३ कोटी रुपये खर्च करुन संघात घेतलेल्या एका १९ वर्षीय खेळाडूची सध्या चर्चा होते आहे.
ADVERTISEMENT
मुंबई इंडियन्सने दक्षिण आफ्रिकेचा १९ वर्षीय खेळाडू डिवॉल्ड ब्रेविसला आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे. डेवॉल्ड ब्रेविस हा नुकत्याच पार पडलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आपल्या फटकेबाजीमुळे प्रसिद्ध झाला होता. भारतीय संघाविरुद्ध सामन्यात केलेल्या खेळीनंतर ब्रेविसला Baby AB हे नाव देण्यात आलं होतं. दक्षिण आफ्रिकेच्याच एबी डिव्हीलियर्सप्रमाणे ब्रेविसकडे मैदानात चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता आहे, त्यामुळे आयपीएल लिलावात अनेक संघांचं त्याच्याकडे लक्ष होतं.
IPL 2022 Auction: लिलावादरम्यान कोसळलेले Hugh Edmeades कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्याविषयी
हे वाचलं का?
बांगलादेशविरुद्ध सामन्यात १३४ धावांची खेळी केली होती. U-19 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज हा मानही ब्रेविसने पटकावला होता. ब्रेविस वर्ल्डकपमधील सहा सामन्यात खेळला आहे. त्याने सहा डावात ८४.३३ च्या सरासरीने ५०६ धावा केल्या आहेत. वर्ल्डकपमध्ये त्याने दोन शतकं आणि तीन अर्धशतक झळकावली आहेत. डेवाल्ड ब्रेविसने अंडर 19 वर्ल्डकपमधील शिखर धवनचा विक्रम मोडला आहे. धवनने २००४ साली झालेल्या स्पर्धेमध्ये ५०५ धावा केल्या होत्या.
IPL 2022, Mega Auction, Ishan Kishan: इशान किशन ठरला सर्वात महागडा खेळाडू, 15.25 कोटी रुपये मोजून कोणी केलं खरेदी?
ADVERTISEMENT
ब्रेविसने U-19 वर्ल्डकप स्पर्धेत ४५ चौकार आणि १८ षटकार लगावत आपल्या फलंदाजीची चुणूक सर्वांना दाखवली होती. वर्ल्डकपमधल्या या कामगिरीमुळे IPL मध्ये त्याच्यावर अपेक्षेप्रमाणे मोठी बोली लागली. ऑक्शनमध्ये ब्रेविसने त्याची बेस प्राइस २० लाख रुपये ठेवली होती. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स या Baby AB ला संघात स्थान देते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
IPL 2022 Mega Auction: पहिल्या दिवसावर भारतीय खेळाडूंचं वर्चस्व
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT