IPL 2022 : चेन्नईच्या पराभवाची हॅटट्रीक, पंजाब किंग्जची सामन्यात बाजी
गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जची यंदाच्या आयपीएल हंगामातली सुरुवात ही निराशाजनक झाली आहे. सलग तिसऱ्या सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सलामीच्या सामन्यात कोलकाता, त्यानंतर लखनऊ आणि तिसऱ्या सामन्यात पंजाबने चेन्नईवर मात केली आहे. पंजाबने विजयासाठी दिलेल्या १८१ धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ १२६ धावांवर आटोपला. पंजाबने या सामन्यात ५४ धावांनी विजय मिळवला. पंजाबच्या संघाची सुरुवात […]
ADVERTISEMENT
गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जची यंदाच्या आयपीएल हंगामातली सुरुवात ही निराशाजनक झाली आहे. सलग तिसऱ्या सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सलामीच्या सामन्यात कोलकाता, त्यानंतर लखनऊ आणि तिसऱ्या सामन्यात पंजाबने चेन्नईवर मात केली आहे. पंजाबने विजयासाठी दिलेल्या १८१ धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ १२६ धावांवर आटोपला. पंजाबने या सामन्यात ५४ धावांनी विजय मिळवला.
ADVERTISEMENT
पंजाबच्या संघाची सुरुवात खराब झाली होती. कर्णधार मयांक अग्रवाल आणि तिसऱ्या क्रमांकावर येणारा भानुका राजपक्षा हा स्वस्तात माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि लिव्हींगस्टोन यांनी पंजाबच्या डावाला आकार दिला. विशेषकरुन लिव्हींगस्टोनने चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई करत ब्रेबॉनच्या मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. ब्राव्होने शिखर धवनला आऊट करत पंजाबची जोडी फोडली. परंतू दुसऱ्या बाजूने लिव्हींगस्टोनने आपलं अर्धशतक पूर्ण करत चेन्नईला कडवी झुंज देणं सुरु ठेवलं होतं.
रविंद्र जाडेजाने लिव्हींगस्टोनला आऊट करत पंजाबला आणखी एक धक्का दिला. लिव्हींगस्टोनने ३२ बॉलमध्ये ५ फोर आणि ५ सिक्स लगावत ६० धावा केल्या. यानंतर जितेश शर्मा, कगिसो रबाडा आणि राहुल चहर यांनी अखेरच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत पंजाबला १८० धावांचा टप्पा गाठून दिला. चेन्नईकडून प्रेटोरियस आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी २-२ तर मुकेश चौधरी, ब्राव्हो आणि जाडेजाने प्रत्येती १-१ विकेट घेतली.
हे वाचलं का?
प्रत्युत्तरादाखल चेन्नईची सुरुवात अतिशय खराब झाली. वैभव अरोराने ऋतुराज गायकवाडला आऊट करत चेन्नईला धक्का दिला. यानंतर CSK च्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. ठराविक अंतराने चेन्नईचे सर्व फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिले. मधल्या फळीत शिवम दुबेने धोनीच्या साथीने महत्वपूर्ण भागीदारी करत आपलं अर्धशतक साजरं केलं. परंतू पंजाबच्या बॉलर्सनी या जोडीला फारसं मैदानात स्थिरावू न देता पंजाबची बाजू वरचढ राहील याची काळजी घेतली. पंजाबकडून राहुल चहरने ३, वैभव अरोरा आणि लिव्हींगस्टोनने प्रत्येकी २-२ तर रबाडा-अर्शदीप सिंग आणि ओडेन स्मिथ यांनी १-१ विकेट घेतली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT