IPL 2022 Auction: ‘या’ खेळाडूंवर लक्ष्मी झाली प्रसन्न; 10 कोटींपेक्षाही जास्त लागली बोली
आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी पार पडलेल्या लिलावाच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंवर लक्ष्मी प्रसन्न झाल्याचं दिसलं. काही खेळाडूंसाठी संघानी १० कोटी आणि त्यापेक्षा जास्त रकमेची बोली लावली. यष्टीरक्षक आणि फलंदाज असलेल्या ईशान किशनला मुंबई इंडियन्सने खरेदी केलं. इशानसाठी मुंबई इंडियन्सने 15.25 कोटी रुपये मोजले. जलदगती गोलंदाज दीपक चाहरला खरेदी करण्यासाठी संघांमध्ये चुरस बघायला मिळाली. अखेरीस चेन्नई सुपर […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी पार पडलेल्या लिलावाच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंवर लक्ष्मी प्रसन्न झाल्याचं दिसलं. काही खेळाडूंसाठी संघानी १० कोटी आणि त्यापेक्षा जास्त रकमेची बोली लावली.
हे वाचलं का?
यष्टीरक्षक आणि फलंदाज असलेल्या ईशान किशनला मुंबई इंडियन्सने खरेदी केलं. इशानसाठी मुंबई इंडियन्सने 15.25 कोटी रुपये मोजले.
ADVERTISEMENT
जलदगती गोलंदाज दीपक चाहरला खरेदी करण्यासाठी संघांमध्ये चुरस बघायला मिळाली. अखेरीस चेन्नई सुपर किंग्स संघाने दीपकला 14 कोटी रुपयांना खरेदी केलं.
ADVERTISEMENT
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसणार आहे. केकेआरने श्रेयससाठी 12.25 कोटींची बोली लावली.
जलदगती गोलंदाज असलेल्या हर्षल पटेलला आरसीबीने खरेदी केलं. आरसीबीने हर्षलला 10.75 कोटी रुपयांना खरेदी केलं.
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू असलेल्या वानिंदू हसरंगाला आरसीबीने (रायल चॅलेंजर्स बंगरुळू) खरेदी केलं. आरसीबीने हसरंगासाठी 10.75 कोटी रुपये मोजले.
वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या निकोलस पूरनला सनरायझर्स हैदराबादने खरेदी केलं. हैदराबादने पूरनसाठी 10.75 कोटींची बोली लावली.
भारताचा जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरला संघात घेण्यासाठी अनेक संघांनी प्रयत्न केले. चेन्नई सुपरकिंग्जनेही बोलीमध्ये सहभाग घेतला मात्र, दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. दिल्लीने शार्दुलला 10.75 कोटींना खरेदी केलं.
गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला राजस्थान रॉयल्सने खरेदी केलं. प्रसिद्ध कृष्णाची बेस प्राइस 1 कोटी होती.
न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज लॉकी फर्ग्युसनलाही मोठी बोली लागली. गुजरात टायटन्सने फर्ग्युसनला 10 कोटींमध्ये खरेदी केलं.
25 वर्षीय गोलंदाज आवेश खानला लखनऊ सुपर जायंटसने खरेदी केलं. लखनऊने आवेशसाठी 10 कोटींची बोली लावली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT