कल्याणचा तुषार देशपांडे आयपीएलमध्ये धोनीसोबत खेळणार, भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न
बंगळुरुत सुरु असलेल्या आयपीएलच्या लिलावात महाराष्ट्राच्या खेळाडूंनीही आपली चमक दाखवली आहे. पहिल्या दिवशी पार पडलेल्या लिलावात मुंबईकडून रणजी करंडक स्पर्धेत खेळणारा आणि मुळचा कल्याणचा तुषार देशपांडेवर चेन्नईने विश्वास दाखवला आहे. २० लाखांच्या बोलीवर तुषार देशपांडेला चेन्नईने विकत घेतल्यामुळे आता मराठमोळा तुषार धोनीच्या साथीने खेळताना दिसणार आहे. याआधीही तुषार आयपीएलमध्ये खेळला आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व […]
ADVERTISEMENT
बंगळुरुत सुरु असलेल्या आयपीएलच्या लिलावात महाराष्ट्राच्या खेळाडूंनीही आपली चमक दाखवली आहे. पहिल्या दिवशी पार पडलेल्या लिलावात मुंबईकडून रणजी करंडक स्पर्धेत खेळणारा आणि मुळचा कल्याणचा तुषार देशपांडेवर चेन्नईने विश्वास दाखवला आहे. २० लाखांच्या बोलीवर तुषार देशपांडेला चेन्नईने विकत घेतल्यामुळे आता मराठमोळा तुषार धोनीच्या साथीने खेळताना दिसणार आहे.
ADVERTISEMENT
याआधीही तुषार आयपीएलमध्ये खेळला आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व केलं आहे. भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न बाळगून असलेल्या तुषारसाठी धोनीसोबत खेळायला मिळणं हा सर्वात मोठा आनंदाचा धक्का होता. “मी खूप आनंदी आहे, आता मला महेंद्र सिंह धोनी सोबत खेळण्याची संधी मिळेल. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, खूप कमी लोकांना अशा संधी मिळतात, मला संधी मिळाली आहे. भारतासाठी कसोटी सामना खेळण्याचे माझे स्वप्न आहे. माझ्या यशाचे सर्व श्रेय माझ्या कुटुंबाला जाते कारण कुटुंबाने मला कठीण काळात साथ दिली आहे”, अशी प्रतिक्रीया तुषारने मुंबई तकशी बोलताना दिली.
वयाच्या पाचव्या वर्षापासून तुषारने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. प्रोफेशनल क्रिकेटमध्ये तुषार देशपांडेने वयाच्या १३ व्या वर्षी पाऊल ठेवलं. दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेन हा तुषारचा आदर्श आहे. यंदा धोनीसोबत खेळायला मिळणार असल्यामुळे तुषार भलताच खुश आहे. तुषारवर लावण्यात आलेल्या बोलीमुळे त्याचे वडीलही आनंदात आहेत. रणजी आणि आयपीएलनंतर आपल्या मुलाला भारताकडून खेळताना पाहण्याचं तुषारच्या वडीलांचं स्वप्न आहे. महेंद्रसिंह धोनीसोबत तुषारला खेळता येणार असल्यामुळे तुषारचे वडील उदय देशपांडेनी समाधान व्यक्त केलं.
हे वाचलं का?
तुषार कल्याणच्या ओक संकुलात आपले वडील आणि आजीसोबत राहतो. २ वर्षांपूर्वी तुषारच्या आईचं कर्करोगाच्या आजाराने निधन झालं होतं. परंतू या धक्क्यातून स्वतःला सावरत तुषारने आपला खेळ सुरु ठेवला. त्याच्या याच मेहनतीचं फळ यंदाच्या आयपीएल लिलावात त्याला मिळालं आहे.
ADVERTISEMENT
IPL 2022 : अमरावतीकर जितेश शर्मावर पंजाब किंग्सची बोली, २० लाखांची रक्कम मोजत घेतलं संघात
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT