IPL 2022 : RCB चे प्रयत्न व्यर्थ, द्विशतकी लक्ष्याचा पाठलाग करत पंजाबचा धडाकेबाज विजय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवीन कर्णधाराच्या सोबतीने मैदानात उतरलेल्या RCB ने पंधराव्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात द्विशतकी धावसंख्या उभारत तगडं आव्हान निर्माण केलं. परंतू पंजाबच्या खेळाडूंनी अखेरपर्यंत झुंज देत २०६ धावांचं आव्हान ७ बॉल कायम राखत पूर्ण केलं. पंजाबने २०६ धावांचं आव्हान ५ विकेट राखून पूर्ण करत दणदणीत विजय नोंदवला. फलंदाजीत प्रत्येक खेळाडूने दिलेलं योगदान आणि मधल्या फळीत मोक्याच्या क्षणी शाहरुख खान आणि ओडेन स्मिथ यांनी केलेली फटकेबाजी पंजाबच्या विजयासाठी कामी आली.

ADVERTISEMENT

पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतलेल्या RCB ने धडाकेबाज सुरुवात केली. कर्णधार फाफ डु-प्लेसिस आणि अनुज रावत यांनी चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी झाल्यानंतर राहुल चहरने अनुज रावतला माघारी धाडलं. यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहलीने डु-प्लेसिसच्या साथीने संघाचा डाव सावरला. दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत RCB ची बाजू वरचढ केली.

या शतकी भागीदारीदरम्यान डु-प्लेसिसने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. ५७ बॉलमध्ये ३ फोर आणि ७ सिक्स लगावत डु-प्लेसिसने ८८ धावा केल्या. अर्शदीप सिंगने त्याला बाद केल्यानंतर दिनेश कार्तिक आणि विराट कोहलीने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला द्विशतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला.

हे वाचलं का?

परंपरा कायम, मुंबईची पहिली मॅच देवाला ! हातात आलेला सामना गमावल्याबद्दल रोहित म्हणतो…

प्रत्युत्तरादाखल पंजाबच्या संघानेही धडाकेबाज सुरुवात करत आपण लगेच हार मानणार नसल्याचं सांगितलं. कर्णधार मयांक अग्रवाल आणि शिखर धवनने पहिल्या ओव्हरपासून फटकेबाजी करत RCB च्या बॉलर्सवर दडपण ठेवलं. हसरंगाने मयांक अग्रवालला आऊट करत पंजाबला पहिला धक्का दिला. परंतू यानंतर आलेल्या फलंदाजांपैकी राज अंगद बावाचा अपवाद वगळता राजपक्षा, लिव्हींगस्टोन यांनी छोटेखानी भागीदारी करत पंजाबचं आव्हान कायम ठेवलं. अखेरच्या षटकांमध्ये शाहरुख खान आणि ओडेन स्मिथ यांनी फटकेबाजी करुन विजय मिळवला. बंगळुरुच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या स्वैर माऱ्याचा फायदाही पंजाबला झाला.

ADVERTISEMENT

IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सला झुकतं माप? रोहितचं इतर संघांना आपल्या खास शैलीत दिलं उत्तर

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT