IPL 2022: ठरलं… 26 मार्चपासून IPLचा धमाका, ‘या’ तारखेला रंगणार फायनल!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

IPL 2022: IPL 2022 च्या आयोजनाची तारीख अखेर समोर आलं आहे. ही स्पर्धा 26 मार्च 2022 पासून सुरू होणार असून अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. गुरुवारी झालेल्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने टाटा आयपीएल 2022 हंगामाबाबत काही महत्त्वाचे निर्णयही घेतले.

ADVERTISEMENT

मुंबई आणि पुण्यातील चार ठिकाणी एकूण 70 लीग सामने खेळवले जाणार आहेत. प्लेऑफ सामन्यांचे ठिकाण नंतर ठरवले जाईल. 2011 प्रमाणे यावेळीही 10 संघांची दोन वेगवेगळ्या गटात विभागणी करण्यात आली आहे.

गुप्र-ए मध्ये मुंबई इंडियन्स (MI), कोलकाता नाइट रायडर्स (KKR), राजस्थान रॉयल्स (RR), दिल्ली कॅपिटल्स ((DC) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) असतील. तर ग्रुप ( चेन्नई सुपर किंग्ज (CSK), सनरायझर्स हैदराबाद (SRH), रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB), पंजाब किंग्स (PBKS) आणि गुजरात टायटन्स (GT) यांना ब गटात ठेवण्यात आले आहे.

हे वाचलं का?

आपल्या गटातील सर्व संघांना एकमेकांशी दोन सामने खेळायचे आहेत, ज्यामध्ये एक सामना घरच्या मैदानावर आणि एक अवे गेम असेल. तसेच, ग्रुप ए आणि ग्रुप बी मधील इतर संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळावा लागेल. परंतु यामध्येही ग्रुप ए मध्ये एकाच ठिकाणी असलेल्या संघासोबत दोन सामने खेळावे लागतील.

उदाहरणार्थ, ग्रुप-ए मध्ये मुंबई इंडियन्सला KKR, RR, DC आणि LSG विरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळावे लागतील. त्याच बरोबर, MI ला देखील CSK विरुद्ध दोनदा आणि ब गटातील उर्वरित संघांविरुद्ध एक-एक सामना खेळावा लागेल.

ADVERTISEMENT

त्याचप्रमाणे, ग्रुप बीमध्ये आरसीबीला CSK, SRH, PBKS आणि GT विरुद्ध दोन सामने खेळावे लागतील. तर आरसीबीलाही दोन वेळा RRचा सामना करावा लागेल. आरसीबीला ग्रुप Aमधील उर्वरित संघांविरुद्ध एक-एक सामना खेळावा लागणार आहे.

ADVERTISEMENT

वानखेडे स्टेडियमवर सर्वाधिक सामने

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 20, ब्रेबॉर्न स्टेडियमवर 15, मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर 20 आणि पुण्यातील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 15 सामने होतील. सर्व संघ वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियममध्ये 4-4 सामने खेळतील, तर 3-3 सामने पुण्यातील ब्रेबॉर्न आणि एमसीए स्टेडियमवर होतील.

ग्रुप A: मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स

ग्रुप B: चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स

  • मुंबई इंडियन्सचे यांच्यासोबत दोन सामने- KKR, RR, DC, LSG, CSK

    मुंबई इंडियन्सचा यांच्यासोबत एक सामना – SRH, RCB, PBKS, GT

  • चेन्नई सुपर किंग्जचे यांच्यासोबत दोन सामने – SRH, RCB, PBKS, GT, MI

    चेन्नई सुपर किंग्जचा यांच्यासोबत एक सामना – KKR, RR, DC, LSG

  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे यांच्यासोबत दोन सामने – CSK, SRH, PBKS, GT, RR

    रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा यांच्यासोबत एक सामना – MI, KKR, DC, LSG

  • कोलकाता नाईट रायडर्सचे यांच्यासोबत दोन सामने- MI, RR, DC, LSG, SRH

    कोलकाता नाईट रायडर्सचा यांच्यासोबत एक सामना – CSK, RCB, PBKS, GT.

  • लखनौ सुपर जायंट्सचे यांच्यासोबत दोन सामने- DC, RR, KKR, MI, GT

    लखनौ सुपर जायंट्सचा यांच्यासोबत एक सामना – PBKS, RCB, SRH, CSK

IPL 2022: बोली लावली मुंबईने खेळाडू विकला दिल्लीला, लिलावात चारु शर्मांचा घोळ पाहिलात का?

  • दिल्ली कॅपिटल्सचे यांच्यासोबत दोन सामने- PBKS, LSG, RR, KKR, MI

    दिल्ली कॅपिटल्सचा यांच्यासोबत एक सामना – GT, RCB, SRH, CSK

  • राजस्थान रॉयल्सचे यांच्यासोबत दोन सामने- RCB, MI, KKR, DC, LSG

    राजस्थान रॉयल्सचा यांच्यासोबत एक सामना – CSK, SRH, PBKS, GT

  • सनरायझर्स हैदराबादचे यांच्यासोबत दोन सामने- KKR, CSK, RCB, PBKS, GT

    सनरायझर्स हैदराबादचा यांच्यासोबत एक सामना – एकदा – MI, RR, DC, LSG

  • गुजरात टायटन्सचे यांच्यासोबत दोन सामने- दोनदा – LSG, PBKS, RCB, SRH, CSK

    गुजरात टायटन्सचा यांच्यासोबत एक सामना – DC, RR, KKR, MI

  • पंजाब किंग्जचे यांच्यासोबत दोन सामने- DC, GT, RCB, SRH, CSK

    पंजाब किंग्जचा यांच्यासोबत एक सामना -LSG, RR, KKR, MI

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT