विराट कोहली क्रिकेटमधून संन्यास घेतोय का? पोस्ट बघून चाहते पडले बुचकळ्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतीय क्रिकेट संघाने नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषक 2022 मध्ये फारशी चांगली कामगिरी केली नाही. उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत होऊन भारतीय संघ बाहेर पडला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, यष्टिरक्षक दिनेश कार्तिक आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांच्यासाठी हा शेवटचा विश्वचषक ठरल्याचे मानले जात आहे. आता या सर्वांना दोन वर्षांनी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात संधी मिळणार नाही, असं बोललं जातंय. दरम्यान, माजी कर्णधार कोहलीने शनिवारी (२६ नोव्हेंबर) एक पोस्ट शेअर करून चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या इनिंगची आठवण करून देत त्याने एक फोटोही शेअर केला.

ADVERTISEMENT

कोहलीच्या या पोस्टमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला

ही पोस्ट पाहिल्यानंतर त्याचे चाहते चांगलेच घाबरले. त्यांना वाटले की कोहलीने निवृत्ती जाहीर केली आहे. कोहलीने ही पोस्ट इंस्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केली आहे. यावर कमेंट करताना चाहत्यांनी लिहिले की, ‘सर अशी पोस्ट शेअर करू नका. मोठा झटका दिला. एकदा असे वाटले की त्याने निवृत्ती घेतली आहे.

मुंबईच्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याशी जोडले गेले

याशिवाय आणखी एका यूजरने लिहिले की, ‘अशी पोस्ट टाकून तुम्ही मला 10 सेकंद घाबरवले. निवृत्तीची बातमी आहे असे वाटले. त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘हॅपी रिटायरमेंट किंग.’ तसेच, आणखी एका युजरने ही पोस्ट मुंबईतील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याशी जोडली आहे. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, “विराट कोहली सरांनी आज पोस्ट का केली, तुमचा संबंध समजत आहे का?”

हे वाचलं का?

धोनीने अशाच प्रकारे निवृत्ती घेतली होती

वास्तविक, कोहलीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो बॅटसह पॅव्हेलियनमध्ये परतताना दिसत आहे. यासोबत कोहलीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘२३ ऑक्टोबर २०२२ माझ्या हृदयात नेहमीच खास असेल. क्रिकेटच्या खेळात मला याआधी कधीच इतकी ऊर्जा जाणवली नव्हती. किती छान संध्याकाळ होती ती.अशाच पद्धतीने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही दोन वर्षांपूर्वी निवृत्ती जाहीर केली होती. त्याने 15 ऑगस्ट 2022 रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, ‘तुमच्या सर्व प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद. मला 7.29 पासून निवृत्त समजा.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT