WTC Final नंतर विराट कोहलीच्या टीम इंडियाला Bio Bubble मधून २० दिवस सुट्टी
न्यूझीलंडविरुद्ध World Test Championship चा अंतिम सामना खेळल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला २० दिवस बायो सिक्युअर बबलमधून सुट्टी मिळणार आहे. WTC Final मॅच खेळल्यानंतर इंग्लंडविरुद्ध टेस्ट मॅच सिरीज खेळण्याआधी विराट कोहलीच्या टीम इंडियाला ४२ दिवसांचा कालावधी बायो सिक्युअर बबलमध्ये काढावा लागणार होता. त्यामुळे या दौऱ्याच्या आयोजनावरुन अनेक माजी खेळाडूंनी बीसीसीआयवर टीकाही केली होती. T-20 […]
ADVERTISEMENT
न्यूझीलंडविरुद्ध World Test Championship चा अंतिम सामना खेळल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला २० दिवस बायो सिक्युअर बबलमधून सुट्टी मिळणार आहे. WTC Final मॅच खेळल्यानंतर इंग्लंडविरुद्ध टेस्ट मॅच सिरीज खेळण्याआधी विराट कोहलीच्या टीम इंडियाला ४२ दिवसांचा कालावधी बायो सिक्युअर बबलमध्ये काढावा लागणार होता. त्यामुळे या दौऱ्याच्या आयोजनावरुन अनेक माजी खेळाडूंनी बीसीसीआयवर टीकाही केली होती.
ADVERTISEMENT
T-20 वर्ल्डकपचं आयोजन युएईत? BCCI स्पर्धा भारतात आयोजित करण्याचे प्रयत्न थांबवणार
बायो सिक्युअर बबल वातावरणात राहून खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता खेळाडूंना ही सवलत देण्यात आली आहे. परंतू इंग्लंडविरुद्ध पहिली टेस्ट सुरु होण्याआधी १४ जुलैदरम्यान टीम इंडियाला या बबलमध्ये परत यावं लागणार आहे. सध्याच्या संघातील अनेक खेळाडू आयपीएलनंतर काहीकाळ घरी जाऊन लगेच इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. अशावेळी बायो सिक्युअर बबलमधून मिळणारा हा ब्रेक खेळाडूंसाठी फायदेशीर ठरु शकतो.
हे वाचलं का?
“२४ जूनला WTC ची फायनल मॅच संपल्यानंतर खेळाडूंनी सुट्टी देण्यात येईल. ४ ऑगस्टपासून भारतीय संघाचा इंग्लंड दौरा सुरु होणार आहे. यासाठी पहिल्या टेस्ट मॅचची तयारी करण्यासाठी खेळाडूंना १४ जुलैला परत बबलमध्ये यावं लागणार आहे. सध्या जगभरातलं कोरोनाचं वातावरण पाहता या २० दिवसांत खेळाडूंना सुट्टी मिळाली असली तरीही इंग्लंड सोडून कुठेही बाहेर जाण्याची परवानगी त्यांना मिळणार नाहीये”, अशी माहिती टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमधील सूत्रांनी दिली.
IPL 2021 चा मुहूर्त ठरला, १९ सप्टेंबरपासून सुरु होणार उर्वरित सिझन
ADVERTISEMENT
World Test Championship साठी असा असेल भारताला संघ –
ADVERTISEMENT
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, लोकेश राहुल, ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव
याव्यतिरीक्त बीसीसीआयने अभिमन्यू इश्वरन, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि अरझान नागवासवाला यांना स्टँडबाय खेळाडू म्हणून स्थान दिलं आहे. WTC फायनल नंतर इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठीही भारताचा हाच संघ मैदानात उतरताना दिसणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT