Man Ki Baat : Tokyo Olympic चं तिकीट मिळवलेल्या मराठमोळ्या प्रवीण जाधवच्या संघर्षाची मोदींनी घेतली दखल
टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला महाराष्ट्राचा मराठमोळा तिरंदाज प्रवीण जाधवच्या संघर्षाची दखल आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे. ‘मन की बात’ या आपल्या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत असताना पंतप्रधान मोदी यांनी आज विविध विषयांवर भाष्य केलं. यात आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंनाही मोदींनी शुभेच्छा दिल्या. प्रवीणबद्दल काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ? प्रवीण […]
ADVERTISEMENT
टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला महाराष्ट्राचा मराठमोळा तिरंदाज प्रवीण जाधवच्या संघर्षाची दखल आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे. ‘मन की बात’ या आपल्या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत असताना पंतप्रधान मोदी यांनी आज विविध विषयांवर भाष्य केलं. यात आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंनाही मोदींनी शुभेच्छा दिल्या.
ADVERTISEMENT
प्रवीणबद्दल काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?
प्रवीण सातारा जिल्ह्यातील एका गावात राहतो. तो एक चांगला तिरंदाज आहे. त्याचे आई-वडील मजुरी करुन कुटुंब चालवतात. त्यांचा मुलगा आज अथक मेहनतीनंतर टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. ही फक्त त्याच्या आई-वडिलांसाठी नाही तर सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
हे वाचलं का?
जर तुम्ही आमच्या प्रवीण जाधवजींच्या बद्दल ऐकले तर तुम्हाला पण वाटेल की किती कठीण संघर्षानंतर प्रवीण जी इथे पोहोचले आहेत. प्रवीण जाधव जी, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका गावात राहतात. ते तिरंदाजीतील उत्कृष्ट खेळाडू आहेत –@narendramodi @mannkibaat 1/2 pic.twitter.com/GKe20vqcfN
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) June 27, 2021
त्यांचे आईवडील मजुरी करून कुटुंब चालवतात आणि आता त्यांचा मुलगा, आपल्या पहिल्या ऑलिंपिकसाठी टोकियोला जात आहे. ही फक्त त्यांच्या आईवडिलांसाठीच नव्हे, तर आपल्या सर्वांसाठीही अभिमानाची गोष्ट आहे. –@narendramodi @mannkibaat 2/2 pic.twitter.com/ToS8ximLXE
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) June 27, 2021
टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र झालेल्या प्रवीण जाधवचा प्रवास सोपा नव्हता. प्रवीण सातारा जिल्ह्यातील फलटण गावाचा तिरंदाज आहे. भारतीय लष्करात हवालदार पदावर कार्यरत असलेल्या प्रवीण जाधवने ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी ३० महिन्यांपेक्षा अधिक काळ कठोर मेहनत घेतली आहे. २०१८ साली दिवाळीत आपल्या गावी गेलेल्या प्रवीणने यानंतर केवळ सरावावर लक्ष दिलं, यानंतर टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरल्यानंतरच तो आपल्या गावाला दिला.
साताऱ्याचा सुपुत्र प्रवीण जाधव याची Tokyo Olympics 2021 साठी निवड
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT